Santosh Deshmukh हत्या प्रकरण : सुरेश धसांनी मर्डरची यादीच वाचली; पोलिसही आरोपीच्या पिंजऱ्यात?
Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभरात गाजत आहे. हिवाळी अधिवेशनातही (Maharashtra Winter Session) या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले होते. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनीही या प्रकरणात एका वृत्तवाहिनीशी बोलाताना नवा गौप्यस्फोट केला आहे. आका काही सापडत नाही. पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर सुरेश धस म्हणाले, मला वाटत नाही की यात कुणाचा दबाव आहे. राज्याचे प्रमुख एकदा बोलले की मी कुणालाच सोडणार नाही मग कोण दबाव आणणार? असा सवाल सुरेश धस यांनी केला. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावर बोलताना त्यांनी जिल्ह्यातील आणखीही काही खून प्रकरणांचा उल्लेख केला.
बीडच्या पोलीस दलात ह्यांच्यासाठी काम करणारे काही लोक आहेत. आता नवीन पोलीस अधीक्षक रुजू झाले आहेत. पण त्यांना अजून माहिती नाही. पण कुणाला कुठं बसवलं हे आम्हाला माहिती आहे. एलसीबीचा प्रमुख कुणी केला तर ह्यांनीच केला. परळीतील संभाजीनगर भागात ते आधी पीआय म्हणून काम करत होते. आता एलसीबी पदावर बसलेला पीआय कारभार चालवत नाही तर त्याच्या मागून दुसरेच कुणीतरी कारभार करत आहेत हे सगळं आम्हाला माहिती आहे.
Video : काय होतास तू अन् काय झालास तू..धनंजय मुंडेंचं नाव घेत काय म्हणाले आमदार सुरेश धस
मी नवीन एसपींना फोन केला होता. मी आता त्यांच्याकडे जाणार आहे. आता लोकांनी तर सर्वपक्षीय मोर्चा सुद्धा आयोजित केला आहे. आता आम्ही जरी भाजपाचे असलो सत्ताधारी असलो तरी लोकांच्या दबावापुढे आम्हालाही जाता येत नाही. त्यामुळे आम्हाला मोर्चात सहभागी व्हावं लागणारच आहे, असे आमदार सुरेश धस म्हणाले.
बीडमध्ये इतकी हिंमत वाढली कशी किंवा इतकी अराजकता कशी निर्माण झाली असा प्रश्न विचारला असता धस म्हणाले, याची सुरुवात संगीत दिघोळे यांच्या खुनापासून झालेली आहे. खून करायचे नंतर मिटवामिटवी करायची. फिर्यादी हेच, गुन्हा दाखल करणारेही हेच. पुन्हा समोरच्याला बोलावून तोडपाणी करणारेही हेच. हे सगळे खून तिथे पचले गेले म्हणून ह्यांचं कार्यक्षेत्र वाढलं. कार्यबाहुल्य वाढलं. आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं.
मी आधीच सांगितलं की आधी संगीत दिघोळे यांच्या खून प्रकरणापासून सुरुवात करावी लागेल. आणखीही प्रकरणं पाहा. किशोर फडचं पाहा, गर्जेचं बघा. काल परवा झालेला जो मर्डर आहे. एक उसतोड्या होता त्याला परळी तालुक्यातल्याच कुणीतरी पठ्ठ्याने कर्नाटकात डोक्यात दगड घालून मारलं. इथपर्यंत मानसिकता कशी जाते. आता बीड पोलीस दलात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. पोलीस दलात जे चुकीचे लोक आहेत त्यांचे फोन कॉल रेकॉर्ड करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
तुम्ही माझ्यासारखा प्रामणिक माणूस गमावला; सुरेश धस असं का म्हणाले?, पंकजा मुंडेंवर का आरोप केले?