Silvina Luna Passed Away: प्लास्टिक सर्जरी जीवावर बेतली, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

Silvina Luna Death News: हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाची सुप्रसिद्ध अभिनेत्री सिल्विना लुना (Silvina Luna ) हिचं निधन झालं आहे. (Silvina Luna Passed Away) वयाच्या ४३ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. प्लास्टिक सर्जरीमुळे तिला किडनीशी संबंधित समस्या निर्माण झाल्या होत्या. यामुळे गुरुवारी सिल्विनाची प्राणज्योत मालवली. Silvina Luna cause of […]

Silvina Luna Passed Away

Silvina Luna Passed Away

Silvina Luna Death News: हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाची सुप्रसिद्ध अभिनेत्री सिल्विना लुना (Silvina Luna ) हिचं निधन झालं आहे. (Silvina Luna Passed Away) वयाच्या ४३ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. प्लास्टिक सर्जरीमुळे तिला किडनीशी संबंधित समस्या निर्माण झाल्या होत्या. यामुळे गुरुवारी सिल्विनाची प्राणज्योत मालवली.

तिच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत. २०११ मध्ये सिल्विना लुनाने प्लास्टिक सर्जरी करण्यात आली होती. यामुळे तिला गेला काही दिवसापासून ती शारीरिक व्याधीने ग्रासलं. चुकीच्या प्लास्टिक सर्जरीमुळे सिल्विना लुना दीर्घकाळापासून किडनीच्या समस्येने ग्रस्त झाली होती. तिचं आजारपण कायम वाढत असायचं, अशातच तिची प्रकृती खालावल्याने गेल्या काही दिवसांपासून तिला अर्जेंटिना येथील इटालियन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. आणि तिथेच तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार सिल्विना लुनाच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. यामुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिच्या प्रकृतीमध्ये काहीच बदल होत नसल्याने डॉक्टरांनी विचारले असता तिच्या भावाने बहिणीला व्हेंटिलेटरवरून काढण्याची परवानगी देण्यात आली होती. यानंतर काही वेळातच लुनाचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Actor RS Shivaji Dies: प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते आर.एस. शिवाजी यांचे निधन

गुरुवारी ३१ ऑगस्ट दिवशी सिल्विनाचं निधन झालं आहे. तिचे वकील फर्नांडो बरलांडो यांनी तिच्या मृत्यू पुष्टी केली. एक चुकीची प्लास्टिक सर्जरीमुळे या लोकप्रिय अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला आहे. तिच्या अभिनय कारकिर्दीत तिने ग्रॅन हार्मोनो २, सेलिब्रिटी स्प्लॅश आणि डिवानी कोमोडिया सारखे अनेक शो केले होते. ती सोशल मीडियावरही कायम सक्रिय होती.

Exit mobile version