Actor RS Shivaji Dies: प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते आर.एस. शिवाजी यांचे निधन

Actor RS Shivaji Dies: प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते आर.एस. शिवाजी यांचे निधन

Comedy Actor RS Shivaji Passed Aways: प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते आरएस शिवाजी यांचे चेन्नई येथे निधन झाले आहे. आरएस शिवाजी तामिळ सिनेमातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात.

आरएस शिवाजी २०२२ साली आलेल्या विक्रम सिनेमामध्ये बघायला मिळाले होते. त्यानंतर त्यांचा लकी मॅन हा सिनेमा नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला होता.

तसेच ट्रेंड अॅनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत ही दुःखद बातमी सांगितली आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये सांगितले आहे की, ‘लोकप्रिय तामिळ पात्र, विनोदी अभिनेते आरएस शिवाजी यांचे आज सकाळी चेन्नई येथे निधन झाले आहे. या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या लकी मॅनमध्ये त्यांनी काम केले होते. तसेच त्यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका देखील साकारल्या आहेत.

Masoom 2: प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूरने केला मोठा खुलासा; म्हणाला, “अवघ्या ३० सेकंदात…

आरएस शिवाजी कमल हसनसह केलेल्या कॉमेडियन भूमिकेसाठी नेहमी ते ओळखले जातात. आरएस शिवाजी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक संथान भारती यांचे बंधू आहेत. आरएस शिवाजी यांनी असिस्टंट डायरेक्टर, साउंड इंजिनिअर आणि लाईन प्रोड्युसर म्हणून अनेकदा काम पाहिले आहे. आरएस शिवाजी, हरीश कल्याण यांच्या ‘Dharala Prabhu’, सुरिया स्टारर ‘सुरराई पोटरू’, साई पल्लवी स्टारर ‘गार्गी’ या सिनेमातील हटक्या भूमिकांसाठी कायम ओळखले जात असतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube