अभिनेत्री झरीन खान रुग्णालयात दाखल, ‘या’ आजाराची लागण झाल्यानं चाहते चिंतेत

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानच्या (Zareen Khan) आजारी असल्याचे वृत्त समोर आलं आहे. झरीनला डेंग्यूची लागण झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झरीनने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना याबाबत माहिती दिली. झरीनला डेंग्यूची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ते झरीनसाठी लवकरात लवकर बरं होण्याची प्रार्थना करत […]

गुनीत मोंगाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार झरीन खान; म्हणाली...

Zareen Khan

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानच्या (Zareen Khan) आजारी असल्याचे वृत्त समोर आलं आहे. झरीनला डेंग्यूची लागण झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झरीनने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना याबाबत माहिती दिली. झरीनला डेंग्यूची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ते झरीनसाठी लवकरात लवकर बरं होण्याची प्रार्थना करत आहेत.

झरीन खान सध्या रुग्णालयात दाखल आहे. तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले असून तिला तीव्र ताप तसेच अंगदुखीचा त्रास होत आहे. झरीनने याआधी तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यामध्ये ती तिच्या हातात एक ड्रिप दिसत होता. मात्र, नंतर अभिनेत्रीने ती स्टोरी हटवली. यानंतर, अभिनेत्री झरीनने आणखी एक स्टोरी पोस्ट केली ज्यामध्ये एक ग्लास रस दिसत आहे. या फोटोसोबत झरीनने ‘रिकव्हरी मोड’ असे लिहिले आहे.

‘राज ठाकरेंनी आपलं आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलंय’; सुनिल तटकरेंचा पलटवार 

झरीन खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना डेंग्यूपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्वच्छ आणि डासमुक्त वातावरण राखण्याच सांगितलं. शिवाय किटकनाशकांचा वारप करण्यास सांगितलं. सध्या मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, ऑगस्ट 2023 च्या पहिल्या आठवड्यात डेंग्यूचे 157 रुग्ण आढळले आहेत. बिग बॉस ओटीटी 2 चा फायनलिस्ट अभिषेक मल्हान देखील डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल आहे.

झरीन खानने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ती ‘हेट स्टोरी 3’, ‘वीर’, ‘वजाह तुम हो’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने पंजाबी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले. झरीनला कतरिना कैफची कॉपी म्हटले जाते.

Exit mobile version