‘राज ठाकरेंनी आपलं आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलंय’; सुनिल तटकरेंचा पलटवार

‘राज ठाकरेंनी आपलं आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलंय’; सुनिल तटकरेंचा पलटवार

राज ठाकरेंनी आपलं आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलं, असल्याची टोलेबाजी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी(Sunil Tatkare) केली आहे. दरम्यान, पनवेलमधील निर्धार मेळाव्यात राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर सुनिल तटकरेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तटकरेंनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला आहे.

चिकन डिश ऑर्डर केली, प्लेटमध्ये दिले उंदराचे मांस; मुंबईतील धक्कादायक प्रकरण

तटकरे म्हणाले, राज ठाकरे यांचं बऱ्यापैकी आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलं आहे. त्यांनी मिमिक्री करण्यापेक्षा आपलं पक्षसंघटन कसं मजबूत करता येईल? यावर अधिक लक्ष केंद्रीत करावं, कुठल्याही पक्षाच्या मागे लोकांची किती ताकद उभी राहते, यावरून राजकारणातलं यश मोजलं जातं, असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

सोडून गेलेल्यांचे बीडमध्ये डिपॉझिट जप्त होणार : बड्या नेत्याचा मुंडेंसह बंडखोर आमदारांना इशारा

तसेच अजित पवारांनी गेल्या ३५ वर्षांत निवडणुका लढवत, पक्ष संघटना मजबूत करत, उत्तम पद्धतीचं प्रशासन दिलं आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकसंग्रह वाढवला आहे. त्यामुळे मला वाटतं की, राज ठाकरेंनी मिमिक्री करण्यापेक्षा आपल्या पक्षाचं संघटन कसं मजबूत करता येईल? यावर अधिक लक्ष केंद्रीत करावं, असा सल्लाही तटकरेंनी दिला आहे.

‘मलाही चेकमेट करण्याचा डाव पण, आम्ही राजकारणातले ग्रँडमास्टर’; CM शिंदेंची विरोधकांवर तिरकी चाल

राज ठाकरे म्हणाले :
अजित पवारांना विचारलं की आपण या सरकारमध्ये का आलात? त्यावर ते म्हणाले “महाराष्ट्राचा विकास करायला आलोय”. अरे कशाला खोटं बोलताय. ६ दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी काढली ना तुमची… पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मग हे सगळेजण टुणकन इथे भाजपाबरोबर आले. कारण, छगन भुजबळांनी अजित पवारांना सांगितलं असणार. आत तुरुंगात काय काय असतं? जाऊ नका… आपण हवं तर इथे भाजपाबरोबर जाऊ पण तिथे तुरुंगात नको.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. त्यांना इतकंच सांगतो की, दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका असाही सल्ला राज ठाकरेंनी भाजपला दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube