‘मलाही चेकमेट करण्याचा डाव पण, आम्ही राजकारणातले ग्रँडमास्टर’; CM शिंदेंची विरोधकांवर तिरकी चाल

‘मलाही चेकमेट करण्याचा डाव पण, आम्ही राजकारणातले ग्रँडमास्टर’; CM शिंदेंची विरोधकांवर तिरकी चाल

CM Eknath Shinde : राजकारणात आम्हालाही एकाच वेळी कितीतरी विरोधकांशी सामना करावा लागतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात. काही अडीच घरे चालणारे घोडे असतात. काही हत्ती असतात. सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात. मागील एक वर्षापासून मलाही चेकमेट करण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. पण त्यांचं स्वप्न काही साकार होत नाही. गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली ती पाहून आम्हाला राजकारणातले ग्रँड मास्टर म्हणतात, अशी बुद्धीबळ स्टाइल तिरक्या चालींची शब्दफेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांवर केली.

पवारांच्या भेटीमागे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे कनेक्शन; भाजपने टाकलेली अट पूर्ण करण्यासाठी धडपड

ठाण्यात पद्मविभूषण विश्वनाथन आनंद आले आहेत, त्यांचे मी येथे स्वागत करतो असे शिंदे म्हणाले. आनंद यांचे कौतुक करताना त्यांनी विरोधकांनाही चांगलेच चिमटे काढले. शिंदे पुढे म्हणाले,विश्वनाथन आनंद यांनी येथील बुद्धीबळ स्पर्धेत आनंद यांनी एकाच वेळी 22 बुद्धीबळपटुंशी सामना केला. त्यांनी राजकारणातच यायला पाहिजे होतं.

मला चेकमेट करण्यात विरोधक फेल

राजकारणात आम्हालाही एकाच वेळी कितीतरी विरोधकांशी सामना करावा लागतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात. काही अडीच घरे चालणारे घोडे असतात. काही हत्ती असतात. सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात. मागील एक वर्षापासून मलाही चेकमेट करण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. पण त्यांचं स्वप्न काही साकार होत नाही.

‘आधी प्रायश्चित्त घ्या, आरोग्यमंत्र्यांना पायउतार करा’; कळव्यातील मृत्यूप्रकरणी ठाकरे गटाचा घणाघात

विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली तरी जनतेच्या विश्वासाचं आणि पाठिंब्याचं बळ माझ्याकडं आहे. त्यामुळे विरोधकच सतत चितपट होत आहेत. आजकाल राजकीय विरोधकांना लढा द्यायचा म्हटलं तर आमच्यासारख्या राजकीय नेत्यांना बुद्धीबळ खेळण्याची नितांत गरज आहे. पण, मला कल्पना आहे एकवेळ राजकारणातलं बुद्धीबळ खेळणं सोप आहे पण जगात स्वतःची ओळख निर्माण करण कठीण आहे.

आम्ही सुद्धा राजकारणातले ग्रँड मास्टर

विश्वनाथन आनंद यांनी एकदा नाहीतर अनेकदा हे करून दाखवलं आहे. ते पाच वेळा जागतिक विजेते ठरलेत. गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली ती पाहून आम्हाला राजकारणातले ग्रँड मास्टर म्हणतात. पण, खरे ग्रँड मास्टर हे विश्वनाथन आनंद हेच आहेत, असे कौतुक शिंदे यांनी केले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube