Adil Khan Durrani : राखी सावंतच्या पतीला अटक, ‘हे’ आहे कारण

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant)पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून राखीच्या लग्नाची चर्चा रंगली होती. आता लग्न मोडल्याची चर्चा सुरु झालीय. राखीनं मीडियासमोर येत पती आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani)गंभीर आरोप केले होते. राखीनं 8 महिन्यांपूर्वी आदिलशी लग्न केलं होतं. आता आदिलचे तीन मुलींसोबत प्रेमसंबंध (Affairs)असल्यानं त्यानं राखीला लग्न लपवण्यासाठी […]

Raut (20)

Raut (20)

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant)पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून राखीच्या लग्नाची चर्चा रंगली होती. आता लग्न मोडल्याची चर्चा सुरु झालीय. राखीनं मीडियासमोर येत पती आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani)गंभीर आरोप केले होते. राखीनं 8 महिन्यांपूर्वी आदिलशी लग्न केलं होतं. आता आदिलचे तीन मुलींसोबत प्रेमसंबंध (Affairs)असल्यानं त्यानं राखीला लग्न लपवण्यासाठी भाग पाडल्याचा दावा केलाय. आदिलच्या गर्लफ्रेंडची (Girlfriend)माहिती देखील राखीनं मीडियाला सांगितलीय. राखीनं आदिलवर विवाहबाह्य संबंध (extramarital affair)असल्याचे आरोप करुन तक्रार दाखल केली होती.

आज दुपारी राखीचा पती आदिल खान दुर्रानीला ओशिवरा पोलिसांनी अटक केलीय. सोमवारी रात्री राखीनं आदिलविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी आदिलला राखीच्या घरातूनच अटक केली आहे.
राखीनं पती आदिल खानवर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले आहेत. त्याबद्दल तक्रारही दाखल केली होती. राखीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आदिलला अटक केल्याचं दिसून आलंय. राखीनं पती आदिलच्या गर्लफ्रेंडबद्दलही यापूर्वीच माहिती दिली आहे.

आदिलवर राखीनं गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालंय. सोमवारी तिचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले, त्यामध्ये राखीनं आदिलवर काही आरोप केल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांत तक्रार दाखल करण्यापूर्वी राखीनं माध्यमांशी संवाद साधला त्यात तिनं सांगितलं की, आदिलने तिच्याच घराच्या चाव्या तिच्याकडून हिसकावून घेतल्या आणि त्या देण्यासाठी तो नकार देतोय.

त्याचबरोबर आदिल तिला त्रास देत असल्याचाही आरोप तिनं केलाय. बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी आदिलनं आपला वापर केल्याचा आरोपही राखीनं केलाय. तिच्याकडील पैसे आणि सोनंही आदिलनं घेतल्याचा राखीनं आरोप केलाय. राखीच्या तक्रारीनंतर आदिलला अटक केलीय.

Exit mobile version