Download App

Adipurush: “रामायण-कुराण यांसारख्या धर्मग्रंथांना तरी सोडा”; कोर्टाने निर्मात्यांना कडक भाषेत झापलं

Adipurush Controversy : बॉलिवूड अभिनेता प्रभास व अभिनेत्री क्रिती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा चांगलाच वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन ११ दिवस होऊन गेले आहेत. (Supreme Court) ६०० कोटींच्या बजेटमध्ये असलेला या सिनेमाने सुरुवात धडाक्यात केली खरी परंतु यातील संवाद आणि अनेक प्रसंगांमुळे सिनेमाला मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागला आहे. तसेच चाहत्यांनीही या सिनेमाकडे पाठ फिरवली आहे. सिनेमातील कलाकारांच्या संवादांवरुन आणि पोशाखांवरुन मोठा गदारोळ सुरू आहे. हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे.

याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात यावरील सुनावणी आज (२७ जून) पार पडली आहे. यावेळी खंडपीठाने या सिनेमाचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना आक्षेपार्ह संवाद लिहिल्याबद्दल तर निर्मात्यांना वादग्रस्त दृश्य चित्रित केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. तसेच आदिपुरूष सिनेमातील आक्षेपार्ह संवाद आणि पात्रांचे पोशाख याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायमूर्तींनी सीबीएफसी म्हणजेच सेन्सॉर बोर्डाला पण फटकारले आहे.

“सेन्सॉर बोर्डाकडून न्यायालयात उपस्थित असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांना विचारण्यात आलं की, या सिनेमातील आक्षेपार्ह दृश्य, कपडे आणि सीन्सद्वारे काय साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं विचारलं जातं की, या धर्माचे लोक खूपच सहिष्णू आहेत. मग तुम्ही त्यांची कसोटी बघणार का? ही त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा आहे का? ही काही प्रोपगंडाअंतर्गत दाखल केलेली याचिका नाही. आम्ही जर याकडे डोळेझाक केली तर तुम्ही त्यांची कसोटी बघणार आहात का?” तर उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

तसेच “सेन्सॉर बोर्डाने त्यांची जबाबदारी पार पाडली आहे का? ज्या धर्माबद्दल हा सिनेमा आहे, नशीब त्या धर्माच्या लोकांनी कोणताही वाद निर्माण केला नाही, ही चांगली गोष्ट असली तरी भगवान राम, हनुमान आणि सीता मातेला अशा प्रकारे सादर करणं खूपच चुकीचं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने सांगितले आहे की, आदिपुरूष या सिनेमात सीता माता, हनुमान आणि इतर पौराणिक पात्रांचं जे चित्रण केलंय ते आक्षेपार्ह आहे. त्यामुळे या सिनेमाचे निर्माते आणि संवाद लेखकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर सेन्सॉर बोर्डाला प्रश्न विचारला आहे की, त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी काय पावलं उचलली होती?

या सिनेमाच्या विरोधात वकील कुलदीप तिवारी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. याविषयीची सुनावणी आज झाली, त्यामध्ये कोर्टाने आदिपुरुषच्या निर्मात्यांना आणि सेन्सॉर बोर्डाला फटकारले आहे. कोर्टाने काल (सोमवार, २६ जून) झालेल्या सुनावणीवेळी सांगितले आहे की, सिनेमा हा समाजाचा आरसा आहे असं सांगितले जातं. येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही काय शिकवणार आहात? सेन्सॉर बोर्डाला त्यांची जबाबदारी समजत नाही का? कोर्टाने हे देखील सांगितले आहे.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

रामायण, कुराण, गुरु ग्रंथसाहेब, भगवद्गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथाना तरी सोडा. या सिनेमात रावण वटवाघुळाला मांस खाऊ घालत असल्याचे देखील दाखवला आहे, सीतेला स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये दाखवलं गेलं आहे. वटवाघुळ हेच रावणाचं वाहन असल्याचे दाखवलं आहे. तसेच काळ्या रंगाची लंका, सुषैण वैद्याचा उल्लेख न करणं, त्यऐवजी बिभीषणाच्या बायकोने लक्ष्मणाला संजीवनी देऊन त्याच्यावर उपचार करणं अशा आक्षेपार्ह प्रसंगांवर न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले आहे.

Tags

follow us