Box Office Collection: १६ जून रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा अवघ्या एका आठवड्यामध्येच बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीचे ३ दिवस दमदार कमाई करणाऱ्या या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये सोमवारपासून घट बघायला मिळाली होती. (Entertainment) आठव्या दिवशी देखील परिस्थिती जशी होती तशीच राहिली. (BOLLYWOOD) शनिवार आणि रविवार वीकेंडमुळे चाहते थोडी गर्दी करतील अशी अपेक्षा होती.
मात्र नवव्या दिवशी देखील लोकांनी सिनेमा न बघण्याचं पसंत केले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. निर्माते आणि लेखकांनी काही संवाद बदलले असले तरी त्याचा फार मोठा परिणाम झाला नाही. दुसऱ्या शनिवारी ‘आदिपुरुष’ने जवळपास ५.२५ कोटींची खरेदी केली आहे. या सिनेमाने एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन हे २६८.५५ कोटी इतके झाले आहे. पहिल्या ३ दिवसांची कमाई बघितलं तर हा सिनेमा चांगलीच कमाई करेल अशी अपेक्षा होती.
परंतु पहिल्या दिवशी ८६.७५ कोटी भारतात कमावणाऱ्या या सिनेमाने चौथ्या दिवशी मात्र १६ कोटी इतकीच कमाई केली आहे. पहिल्या सोमवारच्या कमाईत सर्वाधिक घट होण्याचा रेकॉर्ड देखील ‘आदिपुरुष’च्या नावावर आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पुढील आठवड्यापर्यंत हा सिनेमा आपला गाशा गुंडाळलेला दिसून येणार आहे. नुकतंच ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहीत या सिनेमाच्या निर्मात्यांवर एफआयआर करायची मागणी केली आहे.
Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन
पहिल्या दिवशी सिनेमा नकारात्मक रिव्ह्यू आणि वादग्रस्त संवादामुळे मोठ्या वादात अडकला होता. पहिल्याच दिवशी १४३ कोटींची जगभरात कमाई करणारा ‘आदिपुरुष’ आता ३०० कोटींचा आकडा देखील पार करू शकेल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. सिनेमात प्रभाससह क्रीती सनॉन, देवदत्त नागे, सैफ अली खान, सनी सिंग हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत.
‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने (Om Raut) सांभाळली आहे. या चित्रपटात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेमध्ये आहे. सनी सिंह लक्ष्मणाच्या तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. सैफ अली खानने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ सिनेमाचा जोरदार बोलबाला बघायला मिळाला होता.