Adipurush Controversy: बॉलिवूड अभिनेता प्रभास व अभिनेत्री क्रिती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ हा सिनेमा चांगलाच वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. देशभरातून सर्वच ठिकाणी या सिनेमाला जोरदार विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर (Social media) देखील या सिनेमाची सध्या जोरदार ट्रोलिंग सुरू आहे. अशातच आता या सिनेमावर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे.
एकीकडे या सिनेमाविरोधात अनेक प्रकरणे कोर्टात सुरू असताना, आता या नव्या याचिकेने सिनेमाच्या आणखीनच अडचणी वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अधिवक्ता ममता राणी यांनी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे. याचिकाकर्त्या ममता राणी यांनी सिनेमाच्या निर्मात्यांवर हिंदूंच्या धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहेत. ममता राणी यांनी आपल्या याचिकेमध्ये सांगितले आहे की, ‘सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला दिलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे.
कारण सिनेमातील भगवान श्री राम आणि भगवान बजरंगबली यांच्यासह धार्मिक पात्रांच्या वास्तविक रूपाशी छेडछाड करण्यात आली आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या सिनेमावर बंदी घातली नाही, तर लोकांच्या नैतिक मूल्यांवर याचा मोठा वाईट परिणाम होऊ शकणार आहे. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काय सुनावणी होणार? आणि कोर्ट यावर काय निर्णय घेणार, यावर सिनेमाचे भवितव्य अवलंबून आहे. नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमातील काही आक्षेपार्ह संवादांबद्दल याचिका अदाखल करण्यात आली होती.
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
अलाहाबाद न्यायालयाने नुकतीच या याचिकेवर सुनावणी करण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ या सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुनताशीर शुक्ला यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. एका आठवड्यामध्येच उत्तर मागितले आहे. तर, प्रभू राम आणि भगवान बजरंगबली यांच्यासह धार्मिक पात्रांना आक्षेपार्ह पद्धतीने सादर केल्याने ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या निर्मात्यांनाही न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
आदिपुरुष’वर सोशल मीडियावर अक्षरशः टोळ धाड उठली आहे. या सिनेमाने चाहत्यांना चांगलाच अपेक्षाभंग केला आहे. या सिनेमात प्रभास श्रीराम राम, क्रिती सेनॉन सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेमध्ये आहेत. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे बजरंग बलीच्याच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.