Download App

‘Adipurush’ सिनेमाची १० हजार तिकिटे फ्री देणार! बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याचा मोठा निर्णय

Adipurush : ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास (Prabhas) पुन्हा एकदा भव्यदिव्य सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ (Adipurush) या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. ओम राऊत दिग्दर्शित (Directed by Om Raut) हा सिनेमा येत्या १६ जून रोजी ५ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी एका प्रसिद्ध निर्मात्याने ‘आदिपुरुष’च्या तिकिटांबद्दल मोठी घोषणा केली आहे.

या सिनेमाची कथा रामायणावर आधारित असल्याने रामभक्तीचे कारण देत या निर्मात्याने तब्बल १० हजार मोफत तिकिटं वाटण्याचं जाहीर केले आहे. तेलंगणातील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना ही मोफत तिकिटं वाटली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहेत. ‘आदिपुरुष हा आयुष्यातून एकदाच अनुभवावा असा भव्यदिव्य सिनेमा आहे. त्यामुळे हा सिनेमा सर्वांनी साजरा केला पाहिजे.

प्रभू श्रीराम यांच्याप्रती असलेल्या भक्तीसाठी मी सिनेमाची १० हजार तिकिटं तेलंगणातील सरकारी शाळा, वृद्धाश्रमांमध्ये आणि अनाथाश्रमांमध्ये वाटण्याचे जाहीर करत आहे. तिकिट उपलब्ध करून घेण्यासाठी हा गुगल फॉर्म भरा’, असं ट्विट या निर्मात्याने केले आहे. हा निर्माता म्हणजे ‘कार्तिकेय 2’ या गाजलेल्या तेलुगू सिनेमाचा निर्माता अभिषेक अग्रवाल आहे.

Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…

ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमाची कथा रामायणावर आधारित असली तरी नव्या अंदाजात ती चाहत्यांच्या समोर मांडण्यात येत आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉने जानकी, सैफ अली खानने लंकेश, सनी सिंगने शेष आणि देवदत्त नागेनं बजरंगची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा दुसरा ट्रेलर तिरुपतीमधील भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला आहे.

आदिपुरुष हा सिनेमा आधी ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर ही तारीख १२ जानेवारी २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटाच्या टीझरवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर काही बदल करण्यासाठी निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. अखेर येत्या १६ जून रोजी 3D मध्ये हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us