Download App

Adipurush: ‘आदिपुरुष’मध्ये एकनाथ शिंदे आहेत का? चाहत्यांकडून मुख्यमंत्र्यांची थेट वानराशी तुलना, म्हणाले…

Adipurush: बहुचर्चित ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाचा १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. रामायणावर (Ramayana) आधारित असलेल्या या सिनेमाचे प्रेक्षक प्रतीक्षेत होते. पहिल्याच दिवशी सिनेमाचे शो हाऊसफूल (Housefull) झाले असल्याचे बघायला मिळाले आहे. परंतु हा सिनेमा चाहत्यांच्या फारसा पसंतीस उतरला नसल्याचे चित्र देखील बघायला मिळाला आहे.

https://twitter.com/xavvierrrrrr/status/1669588659698552832?s=20

‘आदिपुरुष’ला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केले आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) या सिनेमातील अनेक क्लिप्स आणि मीम्स (Memes) जोरदार व्हायरल होत आहेत. एका नेटकऱ्याने ‘आदिपुरुष’ सिनेमाबाबत केलेलं एक ट्वीट व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये नेटकऱ्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) ‘आदिपुरुष’ सिनेमातील वानराशी तुलना केली आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

एकनाथ शिंदे आणि सिनेमातील वानराचा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. “एकनाथ शिंदे ‘आदिपुरुष’मध्ये आहेत का? माहीत नाही”, असं त्याने ट्वीटमध्ये विचारल आहे. तसेच मुख्यमंत्र्याविषयी केलेल्या या ट्वीटची ठाणे पोलिसांनी (Thane Police) दखल घेतली आहे. आणि नेटकऱ्याच्या या ट्वीटवर ठाणे पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन रिप्लाय देण्यात आला आहे.

“तुझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर कर” असं ठाणे पोलिसांनी कमेंटमध्ये सांगितले आहे. दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच दमदार कमाई केली आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान मुख्य भूमिकेत असलेल्या हा सिनेमा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमावर टीका केली जात आहे. असं असताना देखील या सिनेमाने पहिल्या दिवशी ९५ ते ९८ कोटींचा मोठा रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

या सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सचे सुपरव्हायजर नेमकं कोण आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण सुपरव्हायजर प्रसाद सुतार (Prasad Sutar) यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. 25 वर्षांचा दांडगा अनुभव असलेले प्रसाद सुतार यांनी अनेक सिनेमासाठी VFX निर्मिती केली आहे. प्रसाद सुतार हे दिग्गज व्हिज्युअल इफेक्ट सुपरव्हायजर आहेत. त्यांनी तान्हाजी (Tanhaji Movie), बाजीराव मस्तानी, डॉन 2 आणि राजनीती यासारख्या सिनेमाकरिता काम केलं आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1998 मध्ये गुलाम या सिनेमातून केली आहे.

Tags

follow us