Adipurush Movie: प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी एक सीट सोडणार! आदिपुरुष टीमचा निर्णय

Adipurush: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या सिनेमाचा चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांअगोदर रिलीज झाला आहे. यानंतर या सिनेमाबद्दलची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली होती. आता या सिनेमाच्या टीमने या सिनेमाबद्दल एक निर्णय हाती घेतला आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या वेळेस निर्मात्यांनी प्रत्येक थिएटरमध्ये भगवान हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवण्याचा निर्णय […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 29T141832.224

Adipurush New Song

Adipurush: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या सिनेमाचा चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांअगोदर रिलीज झाला आहे. यानंतर या सिनेमाबद्दलची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली होती. आता या सिनेमाच्या टीमने या सिनेमाबद्दल एक निर्णय हाती घेतला आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या वेळेस निर्मात्यांनी प्रत्येक थिएटरमध्ये भगवान हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवण्याचा निर्णय हाती घेतला आहे.


आदिपुरुष हा सिनेमा प्रदर्शित करत असताना प्रत्येक सिनेमागृहात भगवान हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवण्याची घोषणा सिनेमाच्या टीमने केली आहे. तसेच निर्मात्यांनी ही घोषणा सिनेमाच्या रिलीजच्या अवघ्या 10 दिवस अगोदरच केली आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये आदिपुरुष सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’ या सिनेमाने रिलीजच्या अगोदरच 432 कोटींचा गल्ला कमावला आहे.

थिएट्रिकल राइट्स, सॅटेलाइट राइट्स, म्यूझिक राइट्स, डिजिटल राइट्स अशा अनेक गोष्टींमधून या सिनेमाने रिलीजअगोदरच मोठी कमाई केली आहे. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा 16 जून रोजी रिलीज होणार आहे. आदिपुरुष या सिनेमात प्रभास हा रामाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे . तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारली आहे. तसेच या सिनेमात सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत असल्याची जोरदार चर्चा आहे.

‘आदिपुरुष’ या सिनेमात मराठमोळा देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या सिनेमातील जय श्री राम हे गाणं रिलीज झाले आहे. जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केले आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच या सिनेमातील राम सिया राम हे गाणं देखील चाहत्यांच्या भेटीला आले आहे.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

जय श्री राम आणि राम सिया राम या आदिपुरुष सिनेमामधील दोन्ही गाण्यांना चाहत्यांनी पसंती दिली आहे. प्रभासचा ‘आदिपुरुष’ अगोदर 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या सिनेमाची मोठ्या उत्सुकेतेने वाट पाहात आहेत.

Exit mobile version