Download App

Aditya Singh Rajput : 17 व्या वर्षी करिअरची सुरुवात ते यशस्वी अभिनेता : कोण होता आदित्य सिंग राजपूत?

Aditya Singh Rajput Dies: प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचा (Aditya Singh Rajput) मृत्यू झाला आहे. आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या अंधेरी (Andheri) येथील घरातील बाथरूममध्ये आढळला. ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘गंदी बात’ फेम अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग हा काम केला आहे.

आदित्य फक्त 32 वर्षांचा होता. सोमवार 22 मे रोजी दुपारी त्याचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये आढळून आला. आदित्य मुंबईतील अंधेरी परिसरात राहत होता. इमारतीच्या 11व्या मजल्यावर राहणाऱ्या आदित्यचा मृतदेह प्रथम त्याच्या मित्राने बघितला आहे. तो बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होता. मित्राने तातडीने इमारतीच्या चौकीदाराला याची माहिती दिली.

 

आदित्यला स्प्लिट्सविला 9 मधून लोकप्रियता मिळाली

आदित्य सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय होता आणि तो त्याच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट आणि फोटो आणि व्हिडिओ कायम चाहत्यांसाठी शेअर करत असत. स्प्लिट्सविला 9 मध्ये भाग घेतल्यानंतर त्याला लोकप्रियता मिळाली होती. परंतु तो काही काळ सिनेमापासून दूर होता.

वयाच्या १७ व्या वर्षी मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात

दिवंगत अभिनेत्याचे कुटुंब उत्तराखंडचे होते, तर आदित्य सिंग राजपूतचा जन्म दिल्लीत झाला होता. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. आदित्य अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला आणि सुरुवातीच्या काळात आईसोबत राहिला. या वर्षांमध्ये, त्याने अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांमध्ये काम केले आणि टीव्ही कार्यक्रम आणि चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी अनेक टीव्ही जाहिराती देखील केल्या.

त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आदित्य सिंग राजपूतच्या मृत्यूचे कारण ड्रग्जचे अतिसेवन केल्याचे सांगितले जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

Music Director Raj : सिनेसृष्टीवर शोककळा, संगीत दिग्दर्शक राज काळाच्या पडद्याआड

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्य सिंग राजपूतने तीनशे पेक्षा जास्त टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले आहे. अभिनयाच्या दुनियेत संघर्ष करत त्याने स्वतःचा ब्रँड ‘पॉप कल्चर’ सुरू केला. ज्या अंतर्गत त्याने कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

सिनेमा आणि या शोमध्ये केलं काम

‘क्रांतिवीर’, ‘मैंने गांधी को नही मारा’, ‘यू मी और हम’ , आदि राजा, मॉम अँड डॅड: द लाईफलाईन लव्ह, लव्हर्स अशा सिनेमामध्ये त्यानं काम केलं होतं. तसेच राजपुताना, लव्ह, कोड रेड, बॅड बॉय या मालिका आणि शोमध्ये देखील उत्तम काम केलं होतं.तसेच अजय देवगण-काजोलच्या यू मी और हम या चित्रपटात आदित्य अमन मेहराच्या भूमिकेत दिसला होता. आदित्यने 2016 मध्ये MTV Splitsvilla 9 या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला, ज्यामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. 26 स्पर्धकांपैकी, सीझनचे विजेते गुरमीत सिंग रहाल आणि काव्या खुराना होते. चित्रपट आणि टीव्ही शो व्यतिरिक्त, आदित्य सिंग राजपूतने काही म्युझिक व्हिडिओंमध्ये देखील काम केले आहे. 2010 मध्ये तो तुमसे मरना है या चित्रपटात श्वेता कोठारीसोबत दिसला होता.

Tags

follow us