Music Director Raj : सिनेसृष्टीवर शोककळा, संगीत दिग्दर्शक राज काळाच्या पडद्याआड

Music Director Raj : सिनेसृष्टीवर शोककळा, संगीत दिग्दर्शक राज काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ दाक्षिणात्य संगीत दिग्दर्शक राज (Music Director Raj) यांचे निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. काल (21 मे) रोजी सायंकाळी हैदराबादमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ते त्यांच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये अचानक कोसळले. यातचं त्यांचा मृत्यू झाला. तेलुगू चित्रपटसृष्टीत (Telugu Film Industry) त्यांचे मोठे योगदान आहे. (Music Director Raj passed away)

 

राज आणि कोटी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध संगीत जोडी आहे. ही जोडी दमदार संगीत देईल याची निर्मात्यांना खात्री असायची. राज-कोटी यांनी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टतील अनेक दिग्गज संगीतकारांसोबत संगीत कंपोज केलंय. आर. रहमानकडे ते प्रोग्रामर म्हणून होते. या राज-कोटी या जोडीने 180 हून अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे.

पुण्यातील उंड्री रोडवर मोठा अपघात, बसची 5-6 वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू, तर 4 जखमी

बालसुब्रमण्यम यांच्या अनेक गाण्यांना त्यांनी संगीत दिले. नागार्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या हॅलो ब्रदर या 1994 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा किताब मिळाला होता. त्यानंतर काही वर्षांनी राज आणि कोटी वेगळे झाले आणि स्वतंत्रपणे काम करू लागले.

राज यांचे खरे नाव थोटकुरा सोमराजू होते. पण सगळे त्यांना राज याच नावाने ओळखत होते. त्यांचे वडील टीवी हे दक्षिणेतील प्रसिद्ध संगीतकार होते. राज यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेते चिंरजीवी यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘राज-कोटी या लोकप्रिय संगीत दिग्दर्शकाच्या जोडीतील राज यांचे निधन झाले, हे कळल्यावर धक्का बसला. अतिशय हुशार संगीतकार असलेल्या राज यांनी माझ्या कारकिर्तीच्या अगदी सुरूवातीच्या सिनेमांसाठी अनेक अप्रतिम गाणी दिली. राज यांचा अकाली निधनामुळे संगीत जगताची मोठी झाली आह. त्यांच्या सर्व चाहत्यांना आणि परिवाराला माझ्या मनापासून संवदेना, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं.

https://twitter.com/sairazesh/status/1660248262308425729?s=20

राज यांनी त्यांच्या कारकिर्तीत यमुदिकी मोगुडू (1988), जयमुनिश्चमु रा (1989), कैदी क्र. 786 (1988), बावा बमरीदी (1993), मुथा मास्त्री या सारख्या चित्रपटांना संगीत दिलं होतं. त्यांनी दिलेल्या संगीतामुळं अनेक चित्रपट हीट ठरले होते. दरम्यान, त्यांच्या जादूई संगीताची भूरळ आजही त्यांच्या चाहत्यांना आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube