Accident : पुण्यात मोठा अपघात, बसची 5-6 वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू, 4 जखमी

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (7)

Horrible accident in Pune’s Undri Chowk, a speeding Bus collided with 5-6 cars; Both died : द टाइम ट्रॅव्ह कंपनीच्या बसचे ब्रेक फेल (Bus brake failure) झाल्याने पुणे शहरात काल सायंकाळी एक भीषण अपघात (Terrible Accident)झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुणे शहरातील कोंढवा परिसरातील एनआयबीएम उंड्री रोडवर हा अपघात झाला. एनआयबीएम उंड्री रोडवरील उतारावर बसचे ब्रेक फेल झाले. अचानक ब्रेक फेल झाल्याने पुढे असणाऱ्या 5 ते 6 वाहनांना या बसने धडक दिली. या बसने दुचाकी, रिक्षा आणि बीएमडब्ल्यू कारसह अनेक वाहनांना धडक दिली. यामुळे भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. चार गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. या फोटोवरून हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज येतो. अनेक वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाची हेळसांड! विहीर मिळाल्या, पण ६ वर्षांपासून वीजच मिळेना!

याबाबत अधिक माहिती अशी की, काल सायंकाळच्या सुमारास कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोडवर एक खासगी बस जात होती. मात्र पुढे जात असताना अचानक बसचे ब्रेक निकामी झाले. यामुळे बसने पुढे जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. त्यामुळं अचानक वाहने एकमेकांवर जोरात आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

Tags

follow us