Election Commission : बोगस मतदानाला बसणार आळा! निवडणूक आयोगाने आणलं नवीन तंत्रज्ञान

Election Commission : बोगस मतदानाला बसणार आळा! निवडणूक आयोगाने आणलं नवीन तंत्रज्ञान

A new technique to prevent bogus voting will use a laser mark instead of ink on the finger : भारतात निवडणुकांचा (Elections) उत्सव उत्साहाने साजरा होता. दरवर्षी एकतरी निवडणूक देशात होत असते. पण या निवडणुकांत काही प्रमाणात बोगस मतदानही (Bogus Voting) होत असते. बोगस मतदानाला रोखण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाने (Election Commission of India) यावर रामबाण उपाय शोधला आहे. बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा (Laser Marking) वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे.

या वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते. सध्या त्याच्या चाचण्या सुरू आहेत. लेझर तंत्रज्ञानामुळं निवडणुकात होणारी हेराफेरी थांबेल. अनेक दिवस लेझरच्या खुणा काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ईव्हीएममध्ये एक कॅमेराही बसवण्यात येणार आहे, जो मतदाराचा फोटो टिपेल. या मतदानासाठी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास शाईचा वापर कालबाह्य होऊ शकतो.

असा बसेल बोगस मतदानाला आळा
लेझर स्पॉटिंगनंतर एखादी व्यक्ती पुन्हा मतदानासाठी आली तर त्याला पकडले जाईल. त्याच वेळी, ईव्हीएममध्ये बसवलेला कॅमेरा एआय तंत्रज्ञानाने पुन्हा मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा शोध घेईल आणि निवडणूक अधिकाऱ्याला अलर्ट पाठवेल.

निवेदन द्यायला आलेल्या शेतकऱ्यांकडे रोहित पवारांनी केलं दुर्लक्ष, व्हिडिओ होतोय व्हायरल 

शाई असते महाग
मतदानासाठी बोटांवर लावण्यात येणाऱ्या शाईत चांदी असलेले एक सिल्व्हर नायट्रेट हे रसायन वापरले जाते. त्यामुळं मतदानासाठी वापरली जाणार शाई महाग असते.

सर्वप्रथम वापर कधी ?
1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतात पहिल्यांदा विशेष शाईचा वापर करण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत या शाईचा वापर होत आहे. मैसून पेंट्स अँड वार्निश लिमिटेड ही एकमेव कंपनी ही मतदानाची शाई बनवते. यासाठी भारताची राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा आणि राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाने कंपनीशी करार केला आहे. या कंपनीची स्थापना 1937 मध्ये महाराजा कृष्णराजा वाडियार IV यांनी केली होती.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने 2.6 लाख शाईच्या बाटल्या मागवल्या होत्या. त्यासाठी 33 कोटी रुपये देण्यात आले. साधारणपणे 350 मतदारांसाठी एक बाटली पुरेशी असते.

दरम्यान, बोगस मतदानामुळं निवडणुकांवर विपरित परिणाम होतो. निवडणूक आयोग आता या बनावट आणि डुप्लिकेट मतदारांवर कारवाई करणार आहे. त्यासाठी नव्या लेझर तंत्रज्ञानाचा त्यासाठी वापर केला जाणार आहे. दरम्यान, या नव्या तंत्रज्ञानामुळं बोगस मतदानाला आळा बसेल का, हेच पाहणं महत्वांच आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube