Viral Video : निवेदन द्यायला आलेल्या शेतकऱ्यांकडे रोहित पवारांचं दुर्लक्ष? व्हिडिओ व्हायरल

Viral Video : निवेदन द्यायला आलेल्या शेतकऱ्यांकडे रोहित पवारांचं दुर्लक्ष? व्हिडिओ व्हायरल

MLA Rohit Pawar neglect farmers who came for road work, video viral : राष्ट्रवादीचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे त्यांच्या कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी ते सातत्याने मंत्रालयातील संबंधित विभागाचे प्रमुख, अधिकारी, नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचबरोबर ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करतात. शेतकऱ्यांच्या (farmer) प्रश्नांसाठी ते सरकारवर टीका करतात. मात्र, आमदार रोहित पवार यांनी त्यांच्याकडे निवदेन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. त्यांची म्हणणं न ऐकताच ते निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.

रोहित पवार हे मागणी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या गाडीतून निघून गेले, याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचं झालं असं की, जामखेड तालुक्यातील खर्डा ते जुनी वाकी या रस्त्याची समस्या आहे. यासाठी परिसरातील ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत होते. शुक्रवारी रोहित पवार या भागात येत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ निवेदन घेऊन त्यांना भेटायला गेले. रोहित पवार हे खर्डा येथे येताच शेतकऱ्यांनी त्यांचे वाहन अडवले. शेतकऱ्यांनी गाडीसमोर ठिय्या आंदोलन केले. पवार गाडीतून खाली उतरतील आणि त्यांचा प्रस्ताव स्वीकारतील, असे शेतकऱ्यांना वाटले. मात्र रोहित पवार गाडीतून उतरले आणि रस्त्यावर बसून ठिय्या करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरून चालत गेले अन् दुसऱ्या गाडीत बसून पुढच्या प्रवासाला निघून गेले. काही लोकांनी त्यांना हाक मारलाी. मात्र, रोहित पवारांनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं.

दरम्यान, या घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मतदारसंघात एकच चर्चा सुरू झली. यानंतर रात्री उशिरा पवार पुन्हा त्या गावात गेले अन् त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी संबंधित रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आंदोलक शेतकऱ्यांना दिले.

मात्र, एरवी लोकांमध्ये मिसळणारे आणि कोणालाही सहज भेटणारे आमदार पवार हे निवेदन द्यायला आलेल्या शेतकऱ्यांशी असे का वागले? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube