Download App

अद्वैत थिएटर नाट्यसंस्थेतर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन, भाऊ कदम आणि सिद्धार्थ कांबळे यांचा होणार सन्मान

Advaita Theater Natya Sanstha : ‘समाजाचे आपण देणे लागतो’ या भूमिकेतून जगणाऱ्या रत्नांचा सन्मान करण्यासाठी अद्वैत थिएटर या नाट्यसंस्थेचे

  • Written By: Last Updated:

Advaita Theater Natya Sanstha : ‘समाजाचे आपण देणे लागतो’ या भूमिकेतून जगणाऱ्या रत्नांचा सन्मान करण्यासाठी अद्वैत थिएटर या नाट्यसंस्थेचे निर्माते राहुल भंडारे यांनी ‘समाजरत्न पुरस्कार 2024 ’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. अद्वैत थिएटर या संस्थेने आतापर्यंत 26 नाटकांची निर्मिती केली आहे. ही संस्था गेल्या 18 वर्षांपासून सक्रीय कार्यरत आहे.

गेल्या 18 वर्षात या संस्थेकडून समाजातील प्रतिष्ठित आणि विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करत आहे. यावर्षी देखील अद्वैत थिएटरकडून सामाजिक बांधिलकी जपत नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सन्मानाचे सत्कारमूर्ती सिद्धार्थ टी. कांबळे (उपाध्यक्ष-मुंबई जिल्हा बँक-जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस,व समाजसेवक) (Siddharth Kamble) आहेत. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि सहकार विभागात विशेष कामगिरी केली आहे आणि कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवणारे आणि रसिकांचे निखळ मनोरंजन करणारे अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) यांना ‘समाजरत्न पुरस्कार 2024 ’ देऊन सन्मानित करणार आहे.

आमदार महेश लांडगेंचे व्हिजन पूर्ण होणार, पिंपरीत निर्माण होणार इंटरनॅशनल मल्टिपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

अद्वैत थिएटरकडून हा सत्कार समारंभ बुधवार 25 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट, मुंबई येथे होणार आहे. या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर,पूज्य महाथेरो राहुल बोधी व ज्येष्ठ विचारवंत व लेखक ज.वि.पवार ह्यांच्या हस्ते सत्कारमूर्तीचा सन्मान होणार आहे. अनिरुद्ध वनकर यांनी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

follow us

संबंधित बातम्या