Bhau Kadam च्या लेकीनं सर्वांना टाकलं चिंतेत, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आजारपणाची माहिती

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 27T115350.860

Bhau Kadam Daughter Mrunmayee Kadam Post Viral: ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शो’ (Comedy show) च्या माध्यमातून भाऊ कदम (Bhau Kadam ) हे नाव आज केवळ महाराष्ट्रात नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. तसं भाऊ कदम याना पहिली ओळख मिळाली ती म्हणजे झी मराठी (Zee Marathi) वरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमामुळे मिळाली आहे. आज जगभरात भाऊ कदमाचा चाहता वर्ग आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by •Mrunmayee kadam•🦄 (@manu_kadam_)


भाऊनं देखील शो पुरतं स्वतःला बांधून न ठेवता सिनेमा,नाटक या माध्यमातूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. आज सिनेमाचा मुख्य अभिनेता म्हणूनही भाऊ कदमची जगभर ओळख आहे. ‘पांडू हवालदार’ या चित्रपटात तर त्याने सोनाली कुलकर्णीचा प्रियकर म्हणून भूमिका साकारली आहे. दोघांच्या भन्नाट केमिस्ट्रीने चित्रपटातील गाण्यांना एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवले आहे.

भाऊ कदम नेहमी सोशल मीडियावर देखील सक्रिय बघायला मिळत असतात. आणि तिथेही दिवसें दिवस त्याचा फॅन फॉलॉइंग वाढत जात असल्याचा दिसून येत आहे. भाऊ कदम प्रमाणेच त्याची मोठी कन्या मृणमयी देखील तितकीच क्रिएटिव्ह असल्याचे दिसून येते. अर्थात ती तिची क्रिएटिव्हिटी सोशल मीडियावर अधिक दाखवत असल्याचे दिसते. यामुळे तिचाही चांगलाच दबदबा आहे.

मृणमयी एक युट्युबर आहे आणि ती तिचे क्रिएटिव्ह व्हिडीओ नेहमी शेअर करत असते. मृणमयी मेकअप आणि फॅशन संबंधित व्हिडीओ शेअर करत असल्याचे दिसून येते. पण मृणमयीच्या एका नुकत्याच केलेल्या पोस्टने तिच्या चाहत्यांबरोबर भाऊ कदमच्या चाहत्यांनाही चिंतेत टाकले आहे. मृणमयीने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या हाताला सलायन लावले असलयाचे दिसून येत आहे.

यावर मृणमयीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे होते की, ”माझी परीक्षा सुरू आहे. शेवटच्या दोन पेपरच्या वेळेस अचानकपणे माझ्या हाताने लिखाण करणं जवळ जवळ सोडून दिले आहे. मलाही वाटलं की आता काही पेपर देता येणार नाही. तरिही मी प्रयत्न करत पेपर लिहिले आहे. माझ्या अंगात ताकद नसताना देखील आणि त्यातच मासिक पाळीचे असह्य दुखणं..पण हे सगळं सहन केल्याचे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

तसेच पुढे मृणमयी म्हणाली, ”फार काही गंभीर नाही, फक्त व्हिटॅमिन आणि कॅल्शियम कमी झाल आहे, बाकी मी मस्त आहे. बरं एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिनं पुढे लिहिलं आहे की,”आता फक्त व्हॉइस ओव्हर बाकी आहे, माझ्या मेकअप सीरिजच्या पुढच्या एपिसोडसाठी. आजच ५ ते ६ पोस्ट करत आहे. ही पोस्ट मृणमयीनं तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली आहे.

Tags

follow us