सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप
Sunil Barve Share Emotional Post : अभिनेता सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ (Amar Photo Studio Drama) या नाटकाचा बोरिवलीत (Borivali)शेवटचा प्रयोग सादर करण्यात आला. हे नाटक प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले होते. अभिनेता सुनील बर्वे (Sunil Barve)सातत्याने सोशल मीडियावर (Social media)सक्रीय असतो. दोन दिवसांपूर्वी अमर फोटो स्टुडिओ नाटकाचा शेवटचा प्रयोग सादर केल्यानंतर सुनील बर्वेनं इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे.
नामांतरावरून भालचंद्र नेमाडेंचा हल्लाबोल; म्हणाले, नावं बदलणारे लोक क्षुद्र
त्यामध्ये सुनील बर्वेनं त्यामध्ये म्हटलंय की, काल ‘अमर फोटो स्टुडिओ’ ह्या आमच्या नाटकाचा बोरिवलीतील शेवटचा प्रयोग होता, तसाच तो पर्ण पेठेचाही शेवटचा प्रयोग होता. सखी शिकायला परदेशी गेल्यानंतर पर्ण प्रयोग करायला लागली, सखी परत आल्यावर दोघी आलटून पालटून प्रयोग करत राहिल्या. नंतर आठ नऊ महिने प्रयोगच झाले नाहीत.
दरम्यान पर्णने चारचौघी नाटक घेतलं, आणि ते धुंवाधार चालू लागलं. अमर…चे शेवटचे काही प्रयोग करायचे ठरवल्यावर तिला प्रयोग करणं शक्य होत नव्हतं, म्हणून आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटत होतं, पण as luck would have it कालचा प्रयोग करणं तिला शक्य झालं आणि तो तिचा अमर फोटो स्टुडिओचा शेवटचा प्रयोग ठरला. सखी ऐवजी ती प्रयोग करण्याचं ठरलं, तेव्हासुद्धा आम्ही तीचं स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केलं, म्हणूनच तिच्या शेवटच्या प्रयोगाला सुद्धा आगळेवेगळेपणा टिकवून ठेवला.
पर्ण, काल तू आम्हा सगळ्यांचे आभार मानलेस, तेव्हा भरून आलं होतं. पण मी सुबक आणि कलाकारखानाच्या टीमच्यावतीने तुझे मनापासून आभार मानतो. सखी परदेशी जाण्याचा विचार करत होती तेव्हा अमर… ऐन बहरात होतं. ते पुढे कसं न्यायचं हा आमच्या समोरचा प्रश्न तू सोडवलास, आणि प्रयोगांची घोडदौड देशात-परदेशातही तशीच चालू ठेवलीस. तू एक उत्तम कलाकार आहेसंच, पण एक सहृदयी माणूस सुद्धा आहेस हे जाणवलं! तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या व अपर्णाकडून आणि अमरच्या संपूर्ण टीमकडून अनेक अनेक शुभेच्छा. असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या पोस्टमध्ये एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यामध्ये अमे वाघ, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, सिद्धेश पुरकर, सखी गोखले, लेखिका मनस्विनी, निर्माते सुनील बर्वे यांच्यासह आदी कलाकार मंडळी दिसत आहेत.