Download App

Priyanka Chopra Deepfake: आलिया, दीपिका नंतर आता प्रियंका चोप्रा डीप फेकच्या जाळ्यात!

Priyanka Chopra Deepfake: रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) नंतर अनेक बॉलिवूड (Bollywood) अनेक अभिनेत्री डीप फेकचा शिकार बनत आहेत. रश्मिकाच्या काही दिवसांनंतर, कतरिना कैफ (Katrina Kaif), काजोल, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि आता प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांचे डीपफेक व्हिडिओ समोर आले आहेत. व्हायरल होत असलेल्या प्रियांकाच्या डीप फेक व्हिडिओ क्लिपमध्ये ती ब्रँडचा प्रचार करताना आणि गुंतवणूकीच्या कल्पनांबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडिओकडे लक्ष देऊन ऐकलं तर त्यातील शब्द बदलले आहेत हे ऐकायला मिळत आहे.

प्रियांकाच्या आधी इतर अभिनेत्रींच्या चेहऱ्यांशी छेडछाड करण्यात आली होती. डीप फेकमध्ये टॉप घातलेल्या मुलीच्या शरीरासोबत रश्मिका मंदान्नाचा चेहरा वापरण्यात आला होता. बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक चाहते अभिनेत्रीच्या समर्थनार्थ पुढे आले होते.

आलिया डीपफेकची शिकार

आलिया भट्टचा चेहरा असलेला एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलियाचा चेहरा असलेल्या फ्लोरल प्रिंट ड्रेसमध्ये एक मुलगी घाणेरडे हावभाव करताना दिसली. व्हिडिओ पाहून ती आलिया नसून कोणीतरी तिचा चेहरा चुकीच्या पद्धतीने वापरला होता हे स्पष्ट झाले.


काजोलचा व्हिडिओ व्हायरल

काजोल प्रकरणात, एका क्लिपमध्ये ‘गेट रेडी विथ मी’ ट्रेंडचा गैरवापर करण्यात आला होता. प्रसिद्ध टिकटोकर रोझी ब्रीनच्या एका व्हिडिओमध्ये, काजोलच्या चेहऱ्याचा वापर तिच्या कपडे बदलतानाचा व्हिडिओ बनवण्यासाठी करण्यात आला होता. पण काही वेळाने त्याचा खरा व्हिडिओ समोर आला.

Alia Deepfake Video: रश्मिका अन् सारापाठोपाठ आलिया भट्ट डीप फेकच्या जाळ्यात!

‘टायगर 3’च्या सीनमध्ये कतरिना झाली डीपफेकची शिकार

कतरिनाचा एक फोटो व्हायरल झाला होता. जो त्याच्या ‘टायगर 3’ चित्रपटातील टॉवेल फाईट सीनचा होता. पण डीपफेकमध्ये, कतरिनाने लो-कट पांढरा टॉप आणि मॅचिंग बॉटम घातलेला दाखवला होता, जो जास्त खुलून दिसत होता. याशिवाय दीपिका पदुकोणचा डीपफेक व्हिडिओही समोर आला होता. सध्या भारतात डीपफेकची प्रकरणे समोर येत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमांचा विचार केला जात आहे.

काय आहे डीपफेक?

डीप फेक हा एक सिंथेटीक मीडियाचा प्रकार आहे. याच्या माध्यमातून एखादा फोटो किंवा व्हिडीओमधील व्यक्तीचा चेहरा बदलण्यात येतो. डीप फेकमध्ये खास करुन आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तयार करण्यात आलेले व्हिडीओ फेक असल्याचे कधीही कळत नाही. अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्याच समन्वय नसणे यातून डीप फेक व्हिडीओ ओळखता येतात. मात्र हे व्हिडीओ बघून आता कलाकारांसोबतच सर्वसामान्य देखील चिंता व्यक्त करत आहेत. असे डीपफेक व्हिडीओ करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज