Alia Deepfake Video: रश्मिका अन् सारापाठोपाठ आलिया भट्ट डीप फेकच्या जाळ्यात!

Alia Deepfake Video: रश्मिका अन् सारापाठोपाठ आलिया भट्ट डीप फेकच्या जाळ्यात!

Alia Bhatt Deepfake Video: आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे डीप फेक (Deepfake) टेक्नॉलॉजी. या तंत्रज्ञानाच्या वापर करून एखाद्या व्हिडीओमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा हुबेहुब चेहरा आणि आवाज बदलण्यात येत आहे. सध्या सर्वसामान्य माणसांना हे व्हिडीओ खरे वाटत आहेत. गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला होता. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरुन चाहते संतापले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @pauseshooter


सध्या सोशल मीडियावर आलियाचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आलियाला अतिशय बोल्ड अंदाजामध्ये दिसत आहे. व्हिडीओ पाहाताच क्षणी लक्षात येत आहे की, हा फेक व्हिडीओ आहे. या व्हिडीओत दिसणारी खरी मुलगी नेमकी कोण आहे? काय करते? याविषयी अद्याप कोणतेही माहिती स्पष्ट झाली नाही. तसेच यावर आलिया काय प्रतिक्रिया देणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आतापर्यंत अभिनेत्री रश्मिका मंदाना, काजोल, कतरिना कैफ आणि सारा तेंडुलकर या डीपफेक व्हिडीओच्या जाळ्यात अडकल्या आहेत. त्यापाठोपाठ आता रणबीर कपूरची बायको अभिनेत्री आलिया भट्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते संताप व्यक्त करत आहेत.

Aishwarya Deepfake Video: रश्मिका अन् सारापाठोपाठ ऐश्वर्या राय डीप फेकच्या जाळ्यात!

काय आहे डीपफेक?

डीप फेक हा एक सिंथेटीक मीडियाचा प्रकार आहे. याच्या माध्यमातून एखादा फोटो किंवा व्हिडीओमधील व्यक्तीचा चेहरा बदलण्यात येतो. डीप फेकमध्ये खास करुन आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तयार करण्यात आलेले व्हिडीओ फेक असल्याचे कधीही कळत नाही. अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्याच समन्वय नसणे यातून डीप फेक व्हिडीओ ओळखता येतात. मात्र हे व्हिडीओ बघून आता कलाकारांसोबतच सर्वसामान्य देखील चिंता व्यक्त करत आहेत. असे डीपफेक व्हिडीओ करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube