Rashmika Mandana Look: रश्मिका मंदानाचा Animal मधील फर्स्ट लुकनं इंटरनेटचा पारा चढला …

Rashmika Mandana Look: रश्मिका मंदानाचा Animal मधील फर्स्ट लुकनं इंटरनेटचा पारा चढला …

Rashmika Mandana Look: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘एनिमल’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सिनेमाची चाहत्यांना देखील मोठी अतुरता लागल्याचे बघायला मिळत आहे. 1 डिसेंबर दिवशी हा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लुक (First look) समोर येत आहेत. नुकताच सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. यामध्ये सिनेमाची मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदाना असल्याचे दिसत आहे. रश्मिकाचा (Rashmika Mandana) घायाळ करणारा लुक पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमामध्ये पडले असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)


अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘एनिमल’ (Animal Movie) या सिनेमात एका गृहिणीची भुमिका साकारत असल्याचे बघायला मिळणार आहे. सिनेमातील हा तिचा पहिला लुक सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. तिच्या लुकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. गितांजली असं रश्मिकाचं सिनेमातील नाव असल्याचे समोर आले आहे. तिच्या या घायाळ फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडल्याचे बघायला मिळत आहे. ‘एनिमल’च्या नव्या पोस्टरमध्ये रश्मिका मंदाना एक टिपिकल भारतीय स्त्रीयाच्या वेशात पाहायला मिळत आहे. तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळावर लाल कुंकू दिसत आहे.

तिच्या गळ्यात असलेल्या नाजून चेननं चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. लाल काठ आणि चौकटी रंगाच्या साडीमध्ये रश्मिकानं चाहत्यांना अगदी घायाळ करून ठेवलं आहे. रश्मिकाचा हा लुक बघून तिच्यावरून नजरच हटत नसल्याचे बघायला मिळत आहे. तसेच गेल्या काही दिवसापासून सिनेमाच्या निर्मात्यांनी ‘एनिमल’ सिनेमातील अभिनेते अनिल कपूर यांचा पहिला लुक देखील सोशल मीडियावर आणला होता.

Boys 4’ चा चौपट धमाका; धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

तसेच नाईट सूट घालून एका सोफ्यावर बसलेल्या अनिल कपूरच्या लुकची देखील जोरदार चर्चा बघायला मिळाली होती. येत्या २८ सप्टेंबर दिवशी एनिमल सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमातील आतापर्यंत समोर आलेल्या कलाकारांच्या भुमिका एकदम हटक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे. यामुळे चाहत्यांना देखील सिनेमासाठी चांगलीच उत्सुकता लागली आहे.सध्या अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या लुकमुळे जोरदार चर्चा होत असल्याचे दिसत आहे. कारण पुष्पानंतर रश्मिका क्रेझ चांगलीच वाढली आहे. पुष्पाची श्रीवल्ली म्हणून सर्वत्र ती प्रसिद्ध झाली होती. आणि आता लवकरच ती पुष्पा 2मध्येही बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube