Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भट्ट दिसणार नव्या भूमिकेत; केली आगामी सिनेमाची घोषणा

Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भट्ट दिसणार नव्या भूमिकेत; केली आगामी सिनेमाची घोषणा

Jigri Announcement: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता लवकरच आलिया एका आगामी सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. करियरच्या शिखरावर असलेल्या आलियाने ‘गंगूबाई काठियावाडी’,(Jigri Announcement) ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘राझी’ या सिनेमातून तिने चाहत्यांचे चांगलच मनोरंजन करत असल्याचे बघायला मिळाले आहे. (Bollywood Film) कायमच सुपर डुपर हिट सिनेमा  देणाऱ्या आलियाचा लवकरच आगामी सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

तिच्या आगामी सिनेमाचे नाव ‘जिगरा’ असं आहे. करण जोहरने नुकताच आलिया भट्ट आणि वासना बाला यांच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच करणने सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करत त्याच्या या नव्या सिनेमाबद्दल माहिती दिल्याचे बघायला मिळत आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असताना सांगितले आहे की, ‘आलियाचा वासना बालबरोबर आगामी सिनेमा येत आहे. सिनेमाचे नाव, ‘जिगरा’ असं आहे. आणि त्याचा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित करत आहे.’ शेअर केलेल्या फर्स्ट लूकने चाहत्यांचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)


तसेच प्रोमोच्या सुरुवातीला एक कोट असल्याचे देखील बघायला मिळत आहे. तो कोट, ‘धैर्याचा विरोधाभास असा आहे की, ते टिकवून ठेवण्यासाठी एखाद्याने जीवनाबद्दल थोडेसे निष्काळजी असणे महत्वाचे आहे. तसेच त्यानंतर पुढे आलिया ही हटक्या अंदाजात बघायला मिळत आहे. ती यामध्ये खांद्यावर बॅग घेत एकटी उभी राहिल्याचे बघायला मिळाली आहे. परंतु या सिनेमात आलिया फक्त अभिनेत्री म्हणून नाही तर, ती निर्माती म्हणून सुद्धा चाहत्यांच्या परत एकदा भेटीला आला आहे. अभिनेत्रीचा हा नवा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

Bobby Deol: ‘ॲनिमल’च्या निर्मात्यांनी शेअर केला आगामी पात्राचा फोटो

तसेच या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे की, वसन बाला दिग्दर्शित या अपवादात्मक कथेवर पुन्हा एकदा…my #Jigra, आलिया भटचे जोरदार पुनरागमन. अतूट प्रेम आणि अतुलनीय धैर्याची कहाणी! जिगरा- २७ सप्टेंबर दिवशी सिनेमा गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या सिनेमाची स्टार कास्ट गुलदस्त्यात आहे. तसेच सिनेमाची निर्मिती, करण जोहर, अपूर्व मेहता, आलिया भट्ट आणि सोमेन मिश्रा आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा वासना बालान यांनी सांभाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube