Bobby Deol: ‘ॲनिमल’च्या निर्मात्यांनी शेअर केला आगामी पात्राचा फोटो

Bobby Deol: ‘ॲनिमल’च्या निर्मात्यांनी शेअर केला आगामी पात्राचा फोटो

Bobby Deol In Animal Movie: सध्या ‘ॲनिमल’ची (Animal) जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत राहिलेल्या या सिनेमाचा टीझर (Animal Movie Teaser) येत्या २८ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच या अगोदर सिनेमातील एका पात्राची चांगलीच चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसापासून रणबीर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदान्नाचा सिनेमातील हटके लूक बघायला मिळाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Animal The Film (@animalthefilm)


आता त्यानंतर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा (Bobby Deol) सिनेमातील पहिला लूक सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. या वर्ष अखेरस अर्थात १ डिसेंबर दिवशी हा सिनेमा  बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. येत्या २८ सप्टेंबर दिवशी अभिनेता रणबीर कपूरचा वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवशी सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये रणबीर कपूरसह, नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. ‘ॲनिमल’च्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून बॉबी देओलचा पहिला लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेत्याचा हा लूक शेअर करत असताना, “ॲनिमलचा हा शत्रू” अशा आशयाचे कॅप्शन देत लूक शेअर करण्यात आला आहे. सध्या अभिनेत्याचे सिनेमातील नेमक काय पात्र असणार आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

हे सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. फक्त बॉबीच्या पात्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा बघायला मिळत आहे. सिनेमात अनिल कपूर बलबीर सिंग नावाचे पात्र साकारणार आहेत. तर रश्मिका सिनेमामध्ये गीतांजली नावाचे पात्र साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. सिनेमातील नवनवीन कॅरेक्टर समोर येत आहे. तसेच सिनेमाबद्दलची चाहत्यांना उत्सुकता देखील वाढत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube