ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Dadasaheb Phalke Award Announced: ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराची घोषणा झाली आहे. याबद्दलची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. हिंदी सिनेमासुष्टीतील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार बहाल केला जाणार आहे. वैदाजी आणि देवानंद या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं आहे. आज नेमकी त्यांची १०० वी जयंती आहे. आणि त्याच दिवशी त्यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच नक्कीच आज योगाचा दिवस म्हणावा लागणार आहे. १९१३ मध्ये भारतातला पहिला बोलपोट तयार करणाऱ्या दादासाहेब फाळके हा पुरस्कार १९६९ पासून दिल जातो. आणि या वर्षीचा हा पुरस्कार वहिदा रेहमान याना देण्यात आला.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे की, ‘वहिदा रहमान जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटतो.

वहिदा रहमान यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलुगू चित्रपटांमधून केली होती. ती चित्रपटांमध्ये जास्त आयटम नंबर करायची. एके दिवशी गुरुदत्तची नजर वहिदा रहमान यांच्यावर पडली आणि त्यांचे नशीब पालटले. वहिदा रहमान यांना हिंदी चित्रपटात आणणारे गुरुदत्त होते. वहिदा रहमान यांनी देवानंदसोबत सीआयडी चित्रपटात पदार्पण केले आणि त्यानंतर प्यासा, कागज के फूल, गाइड, नील कमल, तीसरी कसम, रंग दे बसंती आणि राम और श्याम सारखे सुपरहिट चित्रपट केले.

Katrina Kaif: कैटरीना कैफ ठरली UNIQLO ची पहिली भारतीय ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

वहिदा रहमानने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. वहिदा रहमान यांना राष्ट्रीय पुरस्कार, दोनदा फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मविभूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube