Sara Ali Khan : ब्रेकअपनंतर आई म्हणाली… सारा अली खानने केला खुलासा !

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान तिच्या भूमिकांसह सोशल मिडीयावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत येत असते. आता देखील ती तिच्या आगमी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्या दरम्यान तिने तिच्या ब्रेकअपविषयी एक खुलासा केला आहे. नुकतच तिने एक मुलाखत दिलीस त्यामध्ये तीला प्रश्न विचारण्यात आला की, तिची आई अमृता सिंगची तिच्या ब्रेकअपवर काय प्रतिक्रिया होती ? सारा […]

Sara Amruta

Sara Amruta

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान तिच्या भूमिकांसह सोशल मिडीयावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत येत असते. आता देखील ती तिच्या आगमी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्या दरम्यान तिने तिच्या ब्रेकअपविषयी एक खुलासा केला आहे. नुकतच तिने एक मुलाखत दिलीस त्यामध्ये तीला प्रश्न विचारण्यात आला की, तिची आई अमृता सिंगची तिच्या ब्रेकअपवर काय प्रतिक्रिया होती ?

सारा अली खानच्या रिलेशनशिप बद्दल सांगायचं झालं तर 2020 मध्ये आलेला तिचा चित्रपट‘लव आज कल’दरम्यान सारा आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्यांनी यावर कधीही खुलासा केला नव्हता. पण करण जोहरने या कथित अफेअरवर बोलला होता. पण आता यावर तिची आई अमृता सिंगची तिच्या ब्रेकअपवर काय प्रतिक्रिया होती ? असा प्रश्न विचारला असता सारा म्हणाली की आई अमृता सिंगने यावर केवळ दोनच शब्द बोलली.

सारा अली खानच्या ब्रेकअपनंतर आई अमृता सिंग म्हणाली होती की, ‘हे ठीक आहे’. या दोनचं शब्दांत आईने आपली समजूत काढल्याचं सारा सांगते. सारा अली खान आणि आई अमृता सिंग यांच्यामध्ये खुप घनिष्ट संबंध आहेत. त्या नेहमी सोशन मिडियावर आपले फोटो शेअर असतात. दरम्यान सारा आता वे विक्रांत मैसी आणि चित्रांगदा सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट 31 मार्चला Disney+ Hotstar वर रिलीज होणार आहे.

Exit mobile version