‘हंपी’ नंतर प्रकाश कुंटे आणि स्वरूप स्टुडिओची पुन्हा एकदा जमली गट्टी; चित्रपटाचे नाव आणि कलाकार गुलदस्त्यात

Prakash Kunte-दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख असलेला दिग्दर्शक प्रकाश कुंटे आता एक नवा कोरा कौटुंबिक चित्रपट आपल्या भेटीला घेऊन येणार आहे.

Prakash Kunte

Prakash Kunte

मुंबई : आशयविषय, सादरीकरणाच्या चौकटी मोडून आता मराठी चित्रपट नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. नवनवीन लोकेशन्स आणि त्या अनुषंगानं कथानकाची मांडणी हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्य अधोरेखित होऊ लागलं आहे. अनोखे विषय हाताळणारा दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख असलेला दिग्दर्शक प्रकाश कुंटे आता एक नवा कोरा कौटुंबिक चित्रपट आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून चित्रपटाचा मुहूर्त नुकताच ठाणे येथे संपन्न झाला झाला आहे.

मनस्मिता प्रॉडक्शन आणि स्वरूप स्टुडिओस हे या आगामी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. डॉ. स्मिता नलावडे आणि मंगेश नलावडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सचिन नारकर, विकास पवार आणि प्रभाकर परब हे सहनिर्माते आहेत. आजवर अनेक मराठी चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती स्वरूप स्टडिओज् यांनी केली आहे. चित्रपटाची कथा नितिश बुधकर यांची असून पटकथा-संवाद नितिश बुधकर, आदित्य प्रकाश भगत आणि विभव राजाध्यक्ष यांची आहे. विव्हियन गायकवाड हे सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहणार असून चित्रपटाचे संगीत रोहित राऊत करणार आहे. अतुल साळवे हे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहणार आहेत. लवकरच कलाकारांची नावे जाहीर करण्यात येणार असून दमदार कलाकारांची फळी भेटीस येणार असल्याचे समजते.

प्रकाश कुंटे याने आजवर हाताळलेले विषय हे मनाला भिडणारे असे होते त्यामुळे या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश नक्की कोणती गोष्ट मांडणार आहे याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे यात शंका नाही.

Exit mobile version