ग्लोबल स्टार Ram Charan च्या चित्रपटात झळकणार मराठमोळी सई मांजरेकर; हम्पीमध्ये शूटींग सुरू…

ग्लोबल स्टार Ram Charan च्या चित्रपटात झळकणार मराठमोळी सई मांजरेकर; हम्पीमध्ये शूटींग सुरू…

Sai Manjarekar with Ram Charan upcoming film shooting start in Hampi : मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकर (Sai Manjarekar) आगामी चित्रपटामध्ये (upcoming film) ग्लोबल स्टार राम चरण (Ram Charan) च्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं शूटींग देखील कर्नाटकातील हम्पीमध्ये सुरू झालं आहे.

फडणवीस – आदित्य ठाकरेंची विधिमंडळात भेट, लिफ्टवरुन संवाद रंगला अन् …

या चित्रपटाची प्रस्तुती स्वतः राम चरण करत आहे. तर निर्मिती विक्रम रेड्डी आणि अभिषेक अग्रवाल यांनी केली आहे. चित्रपटाच दिग्दर्शन राम वामसी कृष्णा यांनी केलं आहे. तर यामध्ये निखिल सिद्धार्थ आणि सई मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर अभिनेते अनुपम खेर यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. द इंडिया हाउस असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं शूटींग देखील कर्नाटकातील हम्पीमध्ये सुरू झालं आहे.

भाजपचे अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेसमधून निवडून आल्याचा मला अभिमान…

या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे ग्लोबल स्टार राम चरण या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. हा चित्रपट 1905 वर आधारित पिरियड ड्रामा आहे. यामध्ये प्रेम आणि क्रांती दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचं शूटींग सरू होण्यापूर्वी या टीमने हम्पीच्या विरुपाक्ष मंदिरात पुजा केली. हा चित्रपटाबद्दल आता प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज