Hi Anokhi Gath : श्रेयस अन् मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र, ‘या’ दिवशी येणार ‘ही अनोखी गाठ’

Hi Anokhi Gath : श्रेयस  अन् मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र, ‘या’ दिवशी येणार ‘ही अनोखी गाठ’

Hi Anokhi Gath : ‘ही अनोखी गाठ’ ( Hi Anokhi Gath) या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar ) हे दोघे पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

योध्येनंतर ‘या’ मुस्लिम देशात उभारलं जातंय भव्य मंदिर, नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांचीच आहे तर चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. ‘ही अनोखी गाठ’ च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहेत. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, ‘झी स्टुडिओजसोबत या आधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणे औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतीलच.’’

लोकांना पूनम पांडे हिचा मृत्यू म्हणजे अफवा आहे असं का वाटतंय? अखेर समोर आलं मोठं कारण

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, “झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट घेऊन येत असते. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक समीकरण झाले आहे. त्यामुळे यांच्यासोबत प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी घेऊन येण्यास आम्ही सज्ज झालो आहोत.”

जितेंद्र आव्हाडांनी थेट छगन भुजबळांची का घेतली बाजू?

दरम्यान अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा नुकताच ह्रदयविकाराच्या झटक्यातून सावरला आहे. त्याला हृदय विकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर सर्वच चाहत्यांना त्याची चिंता वाटली होती.त्यानंतर त्याने आता दमदार कमबॅक देखील केलं आहे. त्याच्या धमाल डान्स मुळे सर्वांनाच आनंद झाला आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या आगामी श्रीदेवी प्रसन्न या मराठी चित्रपटामध्ये श्रेयश दिल में बजी गिटार या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यामध्ये सई आणि सिद्धार्थ देखील श्रेयस सोबत थिरकताना दिसले. आपल्या या चित्रपटातील गेस्ट अपिअरन्स बद्दल श्रेयसन इंस्टाग्राम वर माहिती दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज