Shreyas Talpade चं ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर सई-सिद्धार्थसोबत गेस्ट अपिअरन्स देत दमदार कमबॅक
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा नुकताच ह्रदयविकाराच्या झटक्यातून सावरला आहे. त्याला हृदय विकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर सर्वच चाहत्यांना त्याची चिंता वाटली होती.त्यानंतर त्याने आता दमदार कमबॅक देखील केलं आहे. त्याच्या धमाल डान्स मुळे सर्वांनाच आनंद झाला आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या आगामी श्रीदेवी प्रसन्न या मराठी चित्रपटामध्ये श्रेयश दिल में बजी गिटार या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यामध्ये सई आणि सिद्धार्थ देखील श्रेयस सोबत थिरकताना दिसले. आपल्या या चित्रपटातील गेस्ट अपिअरन्स बद्दल श्रेयसन इंस्टाग्राम वर माहिती दिली. यामध्ये तो म्हटला की, अठरा वर्षांपूर्वी मी डान्स केलेल्या गाण्यावर ती मला पुन्हा एकदा डान्स करायला मिळत आहे याचा मला खूप आनंद आहे.
सिद्धार्थ आनंदच्या Fighter साठी काऊंटडाऊन सुरू! चाहत्यांची उत्सुकता शिगेला
लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी (Kumar Taurani) निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे. नवीन वर्षात टीप्स मराठी आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस देणार आहे.
मराठीसोबतच बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली ब्युटिफूल सई ताम्हणकर (Sai Tamhankar ) आणि सध्या मराठीतला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा हॅंडसम सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) पहिल्यांदाच टीप्स मराठीच्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि यातील सई-सिद्धार्थची दिसून आलेली केमिस्ट्री आणि संवादांची जुगलबंदी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवून गेली. विशाल विमल मोढवे दिग्दर्शित ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट 2 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात सई आणि सिद्धार्थ या मुख्य व्यक्तिरेखांसोबतच सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी अदिती मोघे यांनी उचलली असून मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी यातील गाणी संगीतबद्द केली आहेत.