Health Update: श्रेयस तळपदेला हृदय विकाराचा झटका? प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Health Update: श्रेयस तळपदेला हृदय विकाराचा झटका? प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Shreyas Talpade Health Update: मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी मुंबईत शूटिंग दरम्यान श्रेयस अचानक कोसळला आणि बेशुद्ध झाला. (Shreyas Talpade Heart Attack) त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून एंजिओप्लास्टी सर्जरी (Angioplasty) करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘श्रेयसने संपूर्ण दिवस शूटिंग केले होते. त्याची प्रकृती ठिक होती. सेटवर तो मजामस्ती करत होता. आणि त्याने आज एक अॅक्शन सीन देखील शूट केला. शुटिंग संपवून तो घरी गेला. त्यानंतर त्याने बायकोला बरे वाटत नसल्याचे सांगितले. त्याच्या बायकोने तातडीने त्याला रुग्णालयात नेले. दरम्यान श्रेयस बेशुद्ध झाला.’ श्रेयसची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, श्रेयसची प्रकृती अद्याप स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, उच्च रक्तदाबामुळे त्याला अचानक चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. सध्या श्रेयसवर मुंबईतील अंधेरीमधील रुग्णालयात उपचार सुरु असून उद्या डिस्चार्ज मिळणार आहे.

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

श्रेयस तळपदे हा सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं आहे. अनेक पात्रांना आवाजही दिला आहे. इकबाल हा त्याचा पहिला हिंदी सिनेमा होता. या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ओम शांती ओम या चित्रपटात शाहरुख खान बरोबर तो दिसला होता. दक्षिणेतील सुपरहिट चित्ररट पुष्पाच्या हिंदी व्हर्जन सिनेमाला श्रेयसने आवाज दिला होता. गोलमाल रिटर्न्स, हाऊसफुल 2 अशा अनेक हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे. कंगनाच्या इमर्जन्सी या चित्रपटात श्रेयसने भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भुमिका साकारली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube