Shreyas Talpade: श्रेयस तळपदेने केली त्याच्या ‘अजाग्रत’ या पॅन इंडिया ब्लॉकबस्टरची घोषणा

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेने केली त्याच्या ‘अजाग्रत’ या पॅन इंडिया ब्लॉकबस्टरची घोषणा

Ajagrat Movie: अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली स्वतःची एक अनोखी ओळख निर्माण करणारा एक अष्टपैलू अभिनेता म्हणजे (Shreyas Talpade) श्रेयस तळपदे. (Pan India Blockbuster) ‘पुष्पा’ या सुपरहिट सिनेमात अल्लू अर्जूनला हिंदी आवाज दिल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अजाग्रत’ (Ajagrat Movie) या हिंदी सिनेमाद्वारे श्रेयस पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)


‘अंधारामागील सावल्या’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या मराठी सिनेमाची कथा अनपेक्षिरित्या उलगडली जाणार आहे. सिनेमाच्या शक्तिशाली शीर्षकाला तितक्याच ताकदीचे टॅगलाईन लाभल्याने चाहत्यांना या रहस्यमय सिनेमात नेमकं काय बघायला मिळणार आहे, याची उत्सुत्कता चाहत्यांना लागली आहे. या सिनेमात माजी मुख्यमंत्री यांची पत्नी, कन्नडची अभिनेत्री राधिका कुमारस्वामी मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त ‘अजाग्रत’मध्ये सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज, अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, मोहन लाल यांच्यासह अन्य कलाकार आहेत.

या सिनेमात जिवंतपणा आणण्यासाठी सेटची रचना अतिशय बारकाईने करण्यात आली आहे. चित्रीकरणस्थळ अधिक नैसर्गिक वाटण्यासाठी दिग्दर्शक शशिधर यांनी विशेष मेहनत घेतल्याचे बघायला मिळाले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शशिधर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. रवी राज यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून हा सिनेमा पॅन इंडिया नेण्याचा मानस आहे.

Naal Bhaag 2: …अन् भार्गव जगतापची ‘नाळ भाग 2’शी नाळ जोडली गेली

वाढदिवसाचे औचित्य साधून ‘अजाग्रत’च्या राधिका कुमारस्वामी यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. हा सिनेमा हिंदीसह सात विविध भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘अजाग्रत’ हा एक ॲक्शन थ्रिलर असून यात श्रेयस तळपदेसोबत अजून एक बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याची ओळख लवकरच समोर येणार आहे, यामुले सिनेमाची उत्सुकता वाढणार आहे.

हा सिनेमा श्रेयस तळपदेसाठी खास असणार आहे. सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा त्याचा हा पहिला पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. आकर्षक कथानक, कलाकार आणि दूरदर्शी दिग्दर्शनासह ‘अजाग्रत’ भारतीय मनोरंजनसृष्टीत नवीन बेंचमार्क सेट करण्यासाठी सज्ज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube