Shreyas Talpade : श्रावणी सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आलं श्रेयसचं ‘ओम नमः शिवाय’ गाणं

Shreyas Talpade : श्रावणी सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आलं श्रेयसचं ‘ओम नमः शिवाय’ गाणं

Shreyas Talpade Song Out : अभिनेता श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) आगामी चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘लव्ह यू शंकर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. त्यामध्ये आता या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘ओम नमः शिवाय’ असे या गाण्याचे बोल आहेत. तसेच विशेष म्हणजे हे शिवभक्तीवरील गाणं श्रावणी सोमवारीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. याबद्दल अभिनेता श्रेयस तळपदेने सोशल मीडीयावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

RIL AGM 2023: ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांची RIL बोर्डावर नियुक्ती…

काय म्हणाला अभिनेता श्रेयस तळपदे?

या पोस्टमध्ये या गाण्याबद्दल लिहिताना श्रेयस (Shreyas Talpade) म्हणाला, श्रावणी सोमवारी ‘ओम नमः शिवाय’ म्हणत माझं नवं गाणं प्रस्तुत करत आहोत. अनेक दिवसांनंतर माझं नवं गाणं रिलीज होत आहे. या गोष्टीचा आनंद आहेच पण त्याहून जास्त आनंद आहे. तो याचा की हे गाणं देवांचे देव महादेवांचं आहे. आशा करतो की, तुम्हाला हे गाणं आणि पुढच्या महिण्यात येणारा ‘लव्ह यू शंकर’ चित्रपट आवडेल. हे गाणं आवडल्यास आणखी महादेवांच्या भक्तांना ते शेअर करा.

Ahmednagar News : हरेगाव अमानुष मारहाण प्रकरणी मोठी अपडेट! गलांडेसह दोघांना अटक…

कसा आहे ‘लव्ह यू शंकर’?

तान्हाजी फेम इलाक्षी गुप्ता आणि मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) महाशिवरात्री दिवशी त्यांच्या ‘लव्ह यू शंकर’ चित्रफटाचं पोस्टर शेअर करत चर्चेत आले होते. ही कहाणी एका 8 वर्षाच्या मुलाची आणि महादेवांची आहे. तसेच पुनर्जन्मावर आधारित आहे. तर लंडनहून बनारसला आलेल्या मुलाची ही गोष्ट आहे. यामध्ये खूप ड्रामा, कॉमेडी आणि इतर अनेक गोष्टी आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube