RIL AGM 2023: ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांची RIL बोर्डावर नियुक्ती, नीता अंबानी बाहेर

Anant Isha Ambani

RIL AGM 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या संचालक मंडळाने त्यांच्या संचालक मंडळावर ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. त्यांच्या नियुक्तीला संचालक मंडळाने बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यासोबतच नीता अंबानी यांना संचालक मंडळाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.

Subhedar ने बॉक्स ऑफिसचा गड ही केला सर; पहिल्या विकेंडला गाठला कोट्यावधींचा टप्पा

नीता अंबानी RIL च्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. देशातील मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजयची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु झाली आहे.या बैठकीमध्ये रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या आयपीओबद्दल अत्यंत महत्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.

“तुझ्या तोंडात साखर पडो” : सुपर पालकमंत्रीपदावर अजितदादांचे सेफ अन् मिश्किल उत्तर

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर 19 सप्टेंबरला जिओ एअर फायबर लॉन्च होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जिओ एअर फायबर 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस ब्रॉडबँड सेवा घरांमध्ये आणि कार्यालयांना पुरविली जाणार आहे.

जिओ एअर फायबरच्या लॉंचिंगमुळे दूरसंचार क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी सांगण्यात आले की, जिओ एअर फायबरसाठी दररोज 150,000 नवीन कनेक्शन दिले जाऊ शकतात. कंपनीकडून जिओ एअर फायबर गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थात 19 सप्टेंबरला लॉन्च करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

Tags

follow us