Ahmednagar News : हरेगाव अमानुष मारहाण प्रकरणी मोठी अपडेट! गलांडेसह दोघांना अटक…

Ahmednagar News : हरेगाव अमानुष मारहाण प्रकरणी मोठी अपडेट! गलांडेसह दोघांना अटक…

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात चार मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी युवराज नानासाहेब गलांडेसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Gadar 2 पोहचला 500 कोटींजवळ; तिसऱ्या विकेंडलाही बंपर कमाई करत केले रेकॉर्ड

नेमकं प्रकरण काय?

चार मागासवर्गीय तरुणांवर बकऱ्या आणि कबुतरे चोरल्याचा संशय होता. त्यानंतर या घटनेतील सहाही आरोपींनी मागावसवर्गीय तरुणांना घरातून उचलून नेत गलांडे यांच्या शेतातील विहिरीवर नेले. तिथे कपडे काढून त्यांना अर्धनग्न केले. काही जणांनी दोरीने त्यांचे पाय बांधले, तर इतरांनी झाडाला उलटं लटकवत अत्यंत क्रुरपणे मारहाण केली, असे पीडित तरुणांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. या मारहाणीत शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड, खंडागळे हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्यांना शिरापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

‘पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण..,’;ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच संतोष बांगरांना घेरलं

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी शनिवारी हरेगाव बंद ठेवून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जखमींची भेट घेत कारवाईचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी आत्तापर्यंत एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी युवराज नानासाहेब गलांडे (वय ३६) व मनोज वसंत बोडखे या दोघांना नुकतेच अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने ही कारवाई केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube