‘पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण..,’;ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच संतोष बांगरांना घेरलं
Udhav Thackeray : पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण हे नाग उलट डसायला लागले, असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे संतोष बांगर यांना भाषणाच्या सुरुवातीलाच घेरलं आहे. दरम्यान, हिंगोलीत आज उद्धव ठाकरेंची निर्धार सभा पार पडली. या सभेतून विविध मुद्द्यांवर भाष्य करुन ठाकरेंनी सरकावरही हल्लाबोल चढवला आहे.
‘समृद्धी’नंतर मराठवाड्याचे भाग्य उजळणार; फडणवीसांची परभणीत मोठी घोषणा
उद्धव ठाकरे म्हणाले, आजच्या सभेत गद्दारांवर बोलण्यात मी वेळ वाया घालवणार नाही, गद्दारांना नाग समजून त्याची पूजा केली पण हा नाग उलटा डसायला लागला आहे. हिंगोलीतले सर्व शेतकरी बांधवांना माहित आहे की, पायाखाली साप आल्यावर काय करायचं? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष बांगरांविरोधात डाव टाकला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट; गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी
तसेच शिंदे गटाच्या आमदारांसाठी आम्ही पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण आता हे सर्व नाग उलटेच डसायला लागले आहेत. हिंगोलीत आपल्या लोकांवर दादागिरी करणारा आमदार आपल्याला नकोयं, मटक्याचे अड्डेड चालवणारा, उद्धटपणा करणाऱ्याला हिंदुत्व मानायचं का? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी संतोष बांगर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
Ahmednagar News : राष्ट्रवादी भवनात धुडगूस…माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल…
तसेच आता जनतेला कळालंय, त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणाचाही उद्धटपणा जनता सहन करणार नसून त्याचा उद्धटपणा चिरडून, गाडून टाका, अशा गद्दारांना धडा जनताच शिकवणारच असा इशाराच उद्धव ठाकरेंनी संतोष बांगर यांना दिला आहे.
काँग्रेस असो की राष्ट्रवादी, हे आयत्या बिळावरचे नागोबा
डबल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जातं, पण शेतकऱ्यांसाठी काय करताय? डबल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन नुसत्या वाफा सोडतंय, हवेत थापांच्या वाफा सोडतंय, सरकार आपल्या दारी सरकार आपल्या दारी पण योजना फक्त कागदावरी असे म्हणत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, विशेष म्हणजे मला खरच दया येते देशभरामध्ये बाजारबुनग्यांचा कारभार चाललेला आहे, सरकार म्हणून मी मागे एका सभेमध्ये बोललो होतो की, आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, हिंदू आहोतच पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आहे.