मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट; गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट; गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) वाहतुकीबाबत सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर उद्या 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवापर्यंत अवजड वाहनांवर नेण्याला निर्बंध घातले आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

https://www.youtube.com/watch?v=a8rzAjZAcCI

वाहतूक नियंत्रण अधिसूचनेनुसार गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यात मुंबई-गोवा महामार्गावर रस्तेबांधणीचे काम सुरू आहे. गणेशोत्सव काळात भाविकांना चांगला रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे गणेशोत्सवापर्यंत या मार्गावरून जाणारी जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

भ्रष्ट कर्मचाऱ्याला विद्यार्थ्याकडून लाच घेतांना अभाविपने रंगेहात पकडले, सावित्रीबाई फुले विद्यापीठातला प्रकार 

आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलतांना सांगितले की, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. त्यामुळं रस्ते चांगलं असणं गरजेचं आहे. रस्ते खराब असतील तर वाहतुकीला अडथळा येतोच, शिवाय अपघाताचीही शक्यता असते. त्यामुळं सध्या मुंबई-गोवा महामार्गावर आगामी गणेशोत्सवापर्यंत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खड्डे मुक्त करण्याचे जोरात सुरू आहे. हे काम सुरू असल्यामुळं अवजड वाहनांना महामार्गावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा, असे आव्हान मंत्री रवींद्र यांनी दिले

मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांतील 84 किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम युध्द पातळीवर सुरु आहे. 10 सप्टेंबरपासून ही लेन वाहतुकीसाठी खुली होईल, असा विश्वास यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 12 वर्षांपासून रखडलं आहे. या रस्त्याचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी शासनाने जोरदार तयारी केली आहे. सीबीटी हे नवीन तंत्र त्यासाठी वापरले जात आहे. तसेच रवींद्र चव्हाण यांनी या महिन्यात दोन वेळा महामार्गाच्या कामाची पाहणी केली.

मनसे आक्रमक
मनसैनिक मुंबई गोवा महामार्गावरील खड्यामुळं आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रविवारपासून पनवेलमधील पळस्पे फाट्यापासून या महामार्गावर पदयात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकारांसह पळस्पे फाटा येथे जाऊन महामार्गावरील कामाचा पाहणी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube