भ्रष्ट कर्मचाऱ्याला विद्यार्थ्याकडून लाच घेतांना अभाविपने रंगेहात पकडले, सावित्रीबाई फुले विद्यापीठातला प्रकार
पुणे : दिवसेंदिवस लाच घेण्याचं प्रमाण वाढत आहे. अगदी शिक्षण क्षेत्रही त्याला आता अपवाद राहिलं नाही. नुकतीच लाच स्विकारण्याची एक घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) उघडकीस आली आहे. विद्यापीठात बीएचे शिक्षण घेणाऱ्या प्रथम भंडारी (Pratham Bhandari) या विद्यार्थ्याकडून तब्बल 3 हजार रूपयांची लाच घेताना नेवासे नावाच्या कर्मचाऱ्याला अभाविप कार्यकर्त्यांनी आज रंगेहाथ पकडले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.
https://www.youtube.com/watch?v=a8rzAjZAcCI
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुट केलेल्या य या व्हिडिओत दिसतं की, नेवासे नावाचा एक कर्मचारी आणि अभाविपचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची होत आहे. लाच घेतल्यावरून हे कार्यकर्ते कर्मचाऱ्याशी भांडत आहेत. अभाविपचे कार्यकर्ते कर्मचाऱ्याला गुणपत्रकासाठी तुम्ही पैसे घेतले का? असं विचारत आहेत. मात्र, आपण संबंधित विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले नसल्याचं कर्माचारी पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, विद्यार्थी हे मान्य करत नाहीत. उलट तुम्हीच पैसे घेतले आहेत, आणि तब्बल तीन हजार रुपये तुम्ही घेतले आहेत, असा आरोप विद्यार्थी करत आहेत.
आयटीआर सबमिट केल्यानंतर पडताळणी आवश्यक, अन्यथा तुमचा रिटर्न ठरेल अवैध
तुम्ही ज्यांच्याकडून तुम्ही हे पैसे घेतले तो विद्यार्थाी आमच्यासोबत आहे. त्याने दिलेले पैसे त्याला परत द्या. तुम्हाला पगार भेट नाही का? लवकर पैस द्या, नाहीतर कुलगुरूंकडे चला, हा कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून कर्मचारी खिशातून पैसे काढून देतो. त्यानेच मला पैसे दिले. त्याने जाणूनबजून हे कृत्य केल्याचं कर्मचारी सांगत आहे.
हा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात घडला आहे. आज सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर अभाविपने परीक्षा विभागासमोर निदर्शने केली. लाच घेण्याच्या या प्रकारामुळं विद्यापीठातील पर्यायाने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. आधीच महाविद्यालये, प्राध्यापक आणि परीक्षा विभागाच्या चुकांमुळे विद्यापीठात वारंवार ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव मेटाकुटीला येतो. त्यात अशा वेळी कर्मचार्यांकडून लाच घेण्याची बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळं परीक्षा विभागासह विद्यापीठाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दरम्यान, परीक्षा संचालक महेश काकडे यांनी सांगिलते की, परीक्षा विभागात लाचखोरी कदापि खपवून घेतली जाणार नाही. परीक्षा विभाग सर्व विद्यार्थ्यांना कायदेशीर कारवाईत सहकार्य करेल.