Gadar 2 पोहचला 500 कोटींजवळ; तिसऱ्या विकेंडलाही बंपर कमाई करत केले रेकॉर्ड

Gadar 2 पोहचला 500 कोटींजवळ; तिसऱ्या विकेंडलाही बंपर कमाई करत केले रेकॉर्ड

Gadar 2 Box Office Collection : ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाला सनी पाजीचे चाहते सध्या भरभरून प्रेम देत आहेत. ‘गदर 2’ची दमदार कमाई पाहून आता निर्माते आणि कलाकार खूश झाल्याचे दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता सनी पाजी (Sunny Deol) याच्या ‘गदर 2’ या सिनेमाची धमाकेदार कमाई अजून देखील सुरूच असल्याचे बघायला मिळत आहे. ‘गदर 2’बघण्यासाठी चाहते कायम सिनेमागृहामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तर चित्रपट रिलीजच्या सलग तिसऱ्या विकेंडलाही केली बंपर कमाई करतच आहे. आता चित्रपट लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तर चित्रपटाने या कमाईसह एक रेकॉरेडही केले आहे.

एक लाख कोटी लागले तरी चालतील पण बीडला गोदावरी खोऱ्यातून पाणी देणार; अजित पवारांची ग्वाही

लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करणार...

‘गदर 2’ने (Gadar 2) तिसऱ्या विकेंडलाही दमदार कमाई केली आहे. यावेळी चित्रपटाने 450 कोटींचा टप्पा पार केला आहे. काल रिलीजच्या तिसऱ्या रविवारी चित्रपटाने 16. 10 कोटींचा कमाई केली. त्यामुळे आता ‘गदर 2’चा एकुण कमाई 456 कोटी झाली आहे. चित्रपट लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तर ‘गदर 2’ हा सर्वात जास्त वेगात 450 कोटी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.


Gadar 2 Box Office Collection


Gadar 2 Box Office Collection

Sanjay Raut : राऊत शिंदे, फडणवीस अन् अजितदादांना भिडले; थेट सवाल करत घेरण्याचा प्रयत्न

चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन…

‘गदर 2’ (Gadar 2) चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 284.63 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यात ही कमाई 134.37 कोटी झाली. तिसऱ्या आठवड्यात चित्रपट 456 कोटींची कमाई करत 500 कोटींच्या जवळ पोहचला आहे. त्यामुळे या आठवड्यात हा चित्रपट 500 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर सनी देओल, अमिषा पटेल यांच्याशिवाय उत्कर्ष शर्मा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘गदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ‘गदर 2’ (Gadar 2)चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube