एक लाख कोटी लागले तरी चालतील पण बीडला गोदावरी खोऱ्यातून पाणी देणार; अजित पवारांची ग्वाही

एक लाख कोटी लागले तरी चालतील पण बीडला गोदावरी खोऱ्यातून पाणी देणार; अजित पवारांची ग्वाही

बीड : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने अनेक जलसाठे कोरडेच आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी पिके सुकून चालल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. एक लाख कोटी लागले तरी चालेल मला इथल्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी द्यायचे आहे, असं आश्वासन त्यांनी बीड (Ajit Pawar Beed) वासियांना दिलं.

सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची… अस्मितेची… सन्मानाची अन् दुष्काळ मिटवण्यासाठीची… असे घोषवाक्य वापरत काल अजित पवारांची बीडमध्ये सभा झाली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, बीड ही कष्टकऱ्यांची भूमी आहे. सरकारच्या माध्यमातून जनतेचे भले करायचे आहे. शेतकऱ्यांना आधार व मदत करण्याची भूमिका सरकारची आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो… मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आहे. शेतकरी ही माझी जात आहे. मराठवाडयातील पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एक लाख कोटी लागले तरी चालेल मला इथल्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी द्यायचे आहे असे आश्वासन देतानाच राहिलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी गप्प बसणार नाही, असा शब्द त्यांनी जाहीर सभेत बीड वासियांना दिला.

Sanjay Raut : राऊत पुन्हा अजितदादांना भिडले; थेट सवाल करत घेरण्याचा प्रयत्न 

ते म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. पिक विम्यासाठी बीड पॅटर्न काढला. तुमचे पैसे राज्य व केंद्र सरकार भरत आहे. एक रुपयाचा उतरवला आणि सरकारवर साडे चार हजार कोटी रुपये कर्ज झाले. मात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणे आवश्यक आहे ही भूमिका सरकारने घेतली. शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी किंवा समस्या तात्काळ सोडवल्या जातात. मात्र विरोधक नेहमी चुकीचे सांगतात. मात्र, कोण काय बोलते याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही मला लोकांचा फक्त आणि फक्त विकास करायचा आहे. जे कोण काय बोलत आहेत त्यात तथ्य काही नाही. सत्तेत राहून बहुजन, अल्पसंख्याक समाजातील लोकांसाठी काम करायचे आहे. टिकाकरांना कामातून उत्तर द्यायचे असतात हे धोरण माझे आहे, असंही ते म्हणाले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube