Sanjay Raut : एक राऊत सब पे भारी; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांना एकाचवेळी भिडले

  • Written By: Published:
Sanjay Raut : एक राऊत सब पे भारी; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांना एकाचवेळी भिडले

मुंबई : राष्ट्रवादील बंडखोरीनंतर अनेक नेत्यांकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यात ठाकरे गटाचे खासदार संज राऊत (Sanjay Raut) आघाडीवर आहेत. मध्यंतरी खुद्द अजितदादांनी राऊतांनी राष्ट्रवादीचे वकीलपत्र घेतले आहे का? असा थेट सवाल करत मध्ये मध्ये न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यानंतरही अनेकदा राऊतांनी अजित पवारांनी डिवचल्याचे पाहिला मिळाले असून, आपण शाहु, फुले आणि आंबेडकरांचे विचार घेऊन भाजपात गेल्याचे अजित पवार सांगत आहेत. परंतु, भाजपमध्ये अशी विचारधारा कुठे दिसली असा प्रश्न उपस्थित करत राऊत पुन्हा एकदा अजितदादांना भिडले आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनादेखील घेरण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे आगामी काळात राऊत विरूद्ध अजित पवार, शिंदे आणि फडणवीस असा सामना रंगू शकतो. यावेळी राऊतांनी अन्य विषयांवरही भाष्य करत टीकास्त्र सोडले. (Sanjay Raut Press)

Jitendra Awhad : ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताय; आव्हाडांनी अजितदादांच्या गटाला सुनावलं

राऊत म्हणाले की, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून राजकीय गणित निश्चित केली जात होती. राज्यातून देशाला दिशा देण्याचं काम केलं जात होतं. मात्र, आता नव्या सिस्टिमनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बैठकांसाठी गुजरातला जावं लागत आहे. देशाचे गृहमंत्री दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी ते पश्चिमी क्षेत्रीय परिषद बैठक घेणार असून, या बैठकांसाठी गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. गुजरातचे मित्र आपले बांधव आहेत असं म्हणत गुजरातला जाणं हा अपराध आहे का? असा उपरोधित प्रश्न राऊतांनी विचारला आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपले गट पक्ष का सोडले याचा संबंध महाराष्ट्राच्या विकासाशी लावू नये असे सांगणं म्हणजे स्वतःशी प्रतारणा करणं असल्याचे राऊत म्हणाले. अजित पवारांपासून ते हसन मुश्रीफ आणि इकडे एकनाथ शिंदेंपासून ते भावना गवळींपर्यंत कोणी पक्ष का सोडले का पळून गेले हा अख्खा देश महाराष्ट्र आणि देशाची जनता जाणते.

Kishor Kadam : अरे लूट थांबवा रे ही, लोक म्हणून किती लुटणार? टोलवरून अभिनेते किशोर कदम संतापले

सत्तेची हाव नाही मग कशाला मंत्रिपदाची शपथ घेतली?
यावेळी सत्तेत सहभागी झालेले अनेक नेते आम्हाला सत्तेची हाव नाही असं म्हणत आहेत. यावरही राऊतांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, सत्तेची हाव नाही तर मग कशाला मंत्रीपदाची शपथ घेतली यातून बाहेर पडा आणि सामाजिक कार्याला वाहून घ्या असा सल्ला राऊतांनी बंडखोरांना दिला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ शिंदे यांचे कौतुक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोणाच्या पोटात दुखतय हे तुम्हाला कळलं असेल. अजित पवार यांना सगळे लिहून दिले जातं उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सुद्धा काही बोलायचं असेल तर त्यांना लिहून दिलं जातं असा आरोपही राऊतांनी यावेळी केला.

विकास निधाच्या माध्यमातून महाराष्ट्रात लूट

तुम्हाला विकासासाठी भारतीय जनता पार्टीची गुलामगिरी का हवी? असा प्रश्न विचारत सध्या विकास निधीच्या माध्यमातून महाराष्ट्रात लूट सुरू असल्याचे राऊत म्हणाले. हजारो कोटींची लूट या निधीच्या मार्फत महाराष्ट्रात होत आहे. या लुटीची बरोबरी मी मेहुल चौक्शी, निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्या लुटी सोबत करतो. सबका साथ सबका विकास तुम्ही म्हणता मग तसा विकास झाला पाहिजे असे आवाहन राऊतांनी यावेळी शहंना केले.  बेईमान लोकांना तुम्ही निधी देता. मला धमक्या देऊ नका मी डरपोक नाही असे म्हणत मी एजन्सीला घाबरून जाणारा पळकुटा माणूस नाही. माझ्या नादाला लागाल तर अंगावर कपडे राहणार नाही.

Sachin Tendulkar च्या ऑनलाईन गेम जाहिरात प्रकरणी बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, आमची नोटीस तयार

इंडिया आघाडीचा लोगो सर्वांसाठी प्रेरणादायी असेल

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी इंडिया आघाडीची बैठक मुंबईत पार पडणार आहे. यावेळी इंडिया आघाडीचा लोगोचे लॉचिंग केले जाणार आहे. हा लोगो सगळ्यांसाठी प्रेरणादायी असेल असे राऊतांनी यावेळी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube