Jitendra Awhad : ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताय; आव्हाडांनी अजितदादांच्या गटाला सुनावलं

Jitendra Awhad : ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताय; आव्हाडांनी अजितदादांच्या गटाला सुनावलं

Jitendra Awhad on Ajit Pawar Group : जितेंद्र आव्हाडांनी ( Jitendra Awhad ) टीका केली की, ‘बीडकरांना सलाम! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!! ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत.’ असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) काल रविवारी बीडमध्ये झालेल्या सभेवरून त्यांना सुनावलं आहे.

World Athletics Championships : देशाची मान उंचावली! पाकिस्तानला हरवत नीरज चोप्राची ‘सुवर्ण’ कमाई

काय म्हणाले आव्हाड?

काल रविवारी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची सभा झाली. त्यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या 17 तारखेला झालेल्या सभेला उत्तरं दिली. या सभेला धनंजय मुंडे यांनी उत्तर नाही तर उत्तरदायित्वाची सभा असल्याचं म्हटलं. त्यावेळी अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली त्यावर शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी अजित पवार गटाच्या काल रविवारी बीडमध्ये झालेल्या सभेवरून त्यांना सुनावलं आहे.

कोटा येथे आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, लातूरच्या तरुणाने कोचिंग सेंटरच्या इमारतीवरुन उडी

ट्विट करत जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) म्हणाले, ‘बीडकरांना सलाम! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!! ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत.’

काय म्हणाले छगन भुजबळ?

दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्हाला शोभत नसल्याची सडकून टीका मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या स्वाभिमान सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज अजित पवार गटाची सभा बीडमध्ये पार पडली. या सभेदरम्यान, छगन भुजबळ बोलत होते.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

लोक विचारत होते की बीडच्या मातीतील 27 तारखेची सभा ही 17 तारखेच्या सभेची उत्तर सभा आहे का? त्यावेळी मी त्यांना सांगितले की ही उत्तराची सभा नाही तर बीड (Beed) जिल्ह्यातील जनतेच्या सेवेच्या उत्तरदायित्वाची सभा आहे. 17 तारखेच्या सभेत सांगितले की बीड जिल्ह्यातील लोकांनी साहेबांवर फार प्रेम केलं. पण त्या प्रेमाच्या पोटी साहेबांनी बीड जिल्ह्याला काय दिलं हा प्रश्न आहे? पण साहेबांचं उत्तरदायित्व विकासाच्या माध्यामातून अजित पवार यांनी दिलं आहे. त्यामुळे ही सभा उत्तराची नाही तर उत्तरदायित्वाची आहे, अशी टीका करत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या सभेला उत्तर दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube