Sachin Tendulkar च्या ऑनलाईन गेम जाहिरात प्रकरणी बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, आमची नोटीस तयार

Sachin Tendulkar च्या ऑनलाईन गेम जाहिरात प्रकरणी बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, आमची नोटीस तयार

Sachin Tendulkar Warn by Bachchu Kadu : ऑनलाईन गेम जाहिरात प्रकरणी सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) पाठवण्यात येणारी, 30 तारखेला आमची नोटीस तयार होत आहे. आम्ही 30 तारखेपर्यंत सचिन तेंडुलकरला आम्ही वेळ दिली होती. मात्र त्यांनी ती गांभीर्याने घेतली नाही. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आता आम्ही त्यांना 30 तारखेला आमची नोटीस पाठवणार आहोत. असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला दिला आहे.

Chandrayan – 3 उतरलेल्या भागाला ‘शिवशक्ती’ पॉईंट हे नाव का देण्यात आले?

काय म्हणाले आमदार बच्चू कडू?

ऑनलाईन गेम जाहिरात प्रकरणी सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) पाठवण्यात येणारी, 30 तारखेला आमची नोटीस तयार होत आहे. आम्ही 30 तारखेपर्यंत सचिन तेंडुलकरला आम्ही वेळ दिली होती. मात्र त्यांनी ती गांभीर्याने घेतली नाही. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. तर भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने कोणत्या कॅटेगेरीच्या जाहिराती कराव्यात याला मर्यादा किंवा आचारसंहिता आहे. तर केवळ पैशापोटी ऑनलाईन गेमच्या जाहिरात करणे, त्या गेम्सला तरूण सचिन तेंडुलकरमुळे बळी पडत असेल तर त्याचा आम्ही विरोध करू. त्यामुळे आता आम्ही त्यांना 30 तारखेला आमची नोटीस पाठवणार आहोत. असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला दिला आहे.

Sangali News : धक्कादायक! आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा; सांगलीतील घटना


काय आहे प्रकरण?

मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) विरोधात प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी सचिनविरोधात दंड थोपटल आहेत. सचिन ऑनलाइन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. सचिन तेंडुलकरच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे कडू म्हणाले होते. या जाहिरातीतून माघार घेण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

कडू म्हणाले होते, सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन केले जाणार होते. भारतरत्न असलेले सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. देशाचा ते अभिमान आहेत. म्हणून त्यांनी या जाहिरातीतून माघार घ्यावी, ही आमची त्यांना विनंती आहे. अन्यथा आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल, असा इशारा कडू यांनी दिला.

सचिनला नारळपान देणार
आम्ही सचिन (Sachin Tendulkar) यांच्या घरासमोर आंदोलन करू शकतो. भारतीयांची ऑनलाइन गेमपासून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही त्यांना नारळपान देऊ. नारळ देऊ. त्यांना नारळ देऊन त्यातून बाहेर निघण्याची विनंती करू. आमचं आंदोलन नेहमीच वेगळं असतं. यंदाही तसेच काहीतरी असेल. लोकं सुपारी घेतात, तुम्ही नारळ घ्या. जाहिरातच नाही तर ऑनलाइन गेमच हद्दपार करा, असे कडू म्हणाले होते.

.. तर आम्ही आंदोलनही केलं नसतं
राज्यात ऑनलाइन गेम बंद व्हावा यासाठी आम्ही विरोध करत आहोत. जाहिरातीला विरोध करत आहोत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) तुम्ही भारतरत्न आहात. त्यामुळेच आमचा त्यांनी ऑनलाइन गेमची जाहिरात करण्यास विरोध आहे. ते जर भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलनही केलं नसतं, असेही त्यांनी स्पष्ट केले. सचिन तेंडुलकरने या जाहिरातीतून माघार घ्यावी यासाठी आम्ही त्यांना पंधरा दिवसांची मुदत देऊ त्यानंतर मात्र घरासमोरच आंदोलन करू, असा इशाराही कडू यांनी दिला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube