Sangali News : धक्कादायक! आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा; सांगलीतील घटना
Sangali News : सांगलीतील (Sangali News)तील जत तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमदी येथील आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली आहे. जेवणानंतर या विद्यार्थ्यांनी उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीने माडग्याळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने यामध्ये जिवीत हानी झाली नाही.
काय आहे प्रकरण?
सांगलीतील (Sangali News)तील जत तालुक्यामध्ये उमदी येथे विमुक्त आणि भटक्या जमातीतील प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते. जवळपास 200 च्या आसपास विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत. यावेळी या विद्यार्थ्यांना एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न दिले गेले. त्यामध्ये बासुंदी होती. त्यामुळे आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली.
World Athletics Championships : देशाची मान उंचावली! पाकिस्तानला हरवत नीरज चोप्राची ‘सुवर्ण’ कमाई
जेवण झाल्यानंतर लगेचच मुलांना उलट्या व्हायला सुरू झाल्या. तर ही विषबाधा झालेल्या मुलांमध्ये पाच ते पंधरा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचा समावेश आहे. त्यांना तातडीने सांगलीतील (Sangali News) माडग्याळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने यामध्ये जिवीत हानी झाली नाही. तर अद्याप देखील 79 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
सध्या सांगलीतील (Sangali News) या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. तर समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी या घटनेचं गांभीर्य़ लक्षात घेत तात्कळ या प्रकरणाची दखल घेतली. तसेच संपूर्ण घटनेची चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.