Naal Bhaag 2: …अन् भार्गव जगतापची ‘नाळ भाग 2’शी नाळ जोडली गेली

Naal Bhaag 2: …अन् भार्गव जगतापची ‘नाळ भाग 2’शी नाळ जोडली गेली

Naal Bhaag 2 Movie: सध्या सर्वत्र ‘नाळ भाग 2’ या (Naal Bhaag 2) मराठी सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. (Marathi Movie) या सिनेमाचे दिग्दर्शित सुधाकर रेड्डी यंकट्टी (Sudhakar Reddy Yankatti) यांनी केली आहे. या मराठी सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतानाच यामधील कलाकारांचेही चाहते प्रचंड कौतुक करत आहेत. चैतू, चिमी आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या ‘मणी’च्या अभिनयालाही विशेष दाद मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)


‘मणी’ म्हणजेच भार्गव जगताप (Bhargava Jagtap). मनोरंजनसृष्टीची पार्श्वभूमी लाभलेल्या भार्गवची ‘नाळ भाग 2’ साठी अगदी योगायोगाने निवड करण्यात आली आहे. भार्गवचे वडील रत्नकांत जगताप या क्षेत्रात कार्यरत असून ते भार्गवसाठी कधीही शब्द टाकू शकत होते. परंतु त्यांनी आधी शिक्षणाला प्राधान्य दिले. एकदा एका सिनेमाच्या प्रिमिअरला रत्नकांत जगताप भार्गवला घेऊन गेले होते. त्यावेळी ‘नाळ भाग 2’च्या कास्टिंग डिरेक्टरच्या नजरेत भार्गव आला. त्याची निरागसता, ग्रामीण व्यक्तिमत्व त्यांना भावले आणि ‘मणी’ची भूमिका साकारण्याबाबत विचारणा केली.

इतक्या मोठ्या प्रोजेक्टसाठी विचारणा झालीय म्हटल्यावर रत्नकांत जगताप यांनी होकार दिला. या भूमिकेसाठी भार्गवचे ऑडिशन झाले. 14 दिवसांचे वर्कशॉपही झाले आणि ‘नाळ भाग 2’ च्या या तीन महत्वाच्या पात्रांमध्ये त्याची निवड करण्यात आली. ध्यानीमनी नसताना अशी संधी यावी, ही भार्गव आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे.

‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

शहरी वातावरणात वावरलेल्या भार्गवने अवघ्या 14 दिवसांमध्ये ग्रामीण जीवन, तिथले भावविश्व, तिथले बालपण हे सगळे आत्मसात केले आणि अनुभवलेही. नागराज मंजुळे हे नेहमीच आपल्या सिनेमात नवोदितांना संधी देतात आणि त्यांची ही निवड नेहमीच योग्य ठरते. भार्गवच्या बाबतीत देखील तेच घडले. ‘नाळ भाग 2’च्या निमित्ताने भार्गवची नाळ मनोरंजनसृष्टीशी जोडली गेली.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग 2’ सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून या सिनेमात श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube