Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल
Shreyas Talpade Heart Attack : अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. तो सध्या वेलकम टू जंगल सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शुटिंग करून तो घरी आला होता. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या पत्नीने त्याला तातडीने अंधेरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर अॅंजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. श्रेयस तळपदे हा 47 वर्षांचा आहे. तो मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करतो.
या धक्क्यानंतर श्रेयसला मुंबईतील अंधेरीत असलेल्या बेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. श्रेयस तळपदे दिवसभर चित्रीकरण करत असताना चांगला होता. वेलकम टू जंगल या चित्रपटाचे तो चित्रीकरण करत होता. येथून घरी गेल्यावर मात्र त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या घरच्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी श्रेयसला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.
Actor Shreyas Talpade suffered a heart attack and was admitted to a hospital in Mumbai where he underwent an angioplasty. His condition is stable now.
(File pic) pic.twitter.com/I8RRSFyZFD
— ANI (@ANI) December 14, 2023
याबाबत रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली की, श्रेयसला काल रात्री दहा वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर येथे त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. दिवसभर चित्रीकरण करत असताना तो एकदम व्यवस्थित होता. नंतर घरी गेल्यावर त्याला त्रास जाणवू लागला. श्रेयसची पत्नी दिप्ती हीने श्रेयसला दवाखान्यात आणले. येथे आल्यानंतर त्याला चक्कर आली. त्यानंतर ताबडतोब पुढील उपचार सुरू करण्यात आले.
श्रेयस तळपदे हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं आहे. अनेक पात्रांना आवाजही दिला आहे. इकबाल हा त्याचा पहिला हिंदी सिनेमा होता. या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ओम शांती ओम या चित्रपटात शाहरुख खान बरोबर तो दिसला होता. दक्षिणेतील सुपरहिट चित्ररट पुष्पाच्या हिंदी व्हर्जन सिनेमाला श्रेयसने आवाज दिला होता. गोलमाल रिटर्न्स, हाऊसफुल 2 अशा अनेक हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे. कंगनाच्या इमर्जन्सी या चित्रपटात श्रेयसने भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भुमिका साकारली आहे.