घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून हवा प्रदुषित करण्यासाठी बिल्डरांना मोकळं रान…; आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका
Aditya Thackeray : उद्याला (दि. 21 जानेवारी) मुंबई टाटा मॅरेथॉन 2024 (Mumbai Tata Marathon 2024) पार पडणार आहे. मात्र, मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली आहे. काल (शनिवारी) सकाळी मुंबईतील हवेची गुणवत्ता बरीच खालावली होती. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) या मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या धावपटूंबाबत काळीज व्यक्त केली. त्यांनी मुंबईच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) घणाघाती टीकाही केली. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईची हवा प्रदुषित करण्यासाठी आपल्या कंत्राटदारांना, बिल्डरांना मोकळं रान दिलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सिद्धार्थ आनंदच्या Fighter साठी काऊंटडाऊन सुरू! चाहत्यांची उत्सुकता शिगेला
शिवसेनेत फुट पडल्यापासून आादित्य ठाकरे हे शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. त्यावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गट कायम शिंदे गटाची कोंडी करत आहेत. दरम्यान, आताही आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र डागलं. आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत लिहिलं की, आजची हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण पाहता, मला उद्या टाटा मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या सर्व धावपटूंची काळजी वाटते. गेल्या 2 दिवसांसारखी स्वच्छ हवा उद्या देखील असावी, अशी मी प्रार्थना करतो. जो खरचं एक चमत्कारच होता, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी धावपटूबाबत काळजी व्यक्त केली.
आजची हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण पाहून, उद्या @TataMumMarathon मध्ये धावणाऱ्या सर्व धावपटूंची मला काळजी वाटते.
गेल्या २ दिवसांसारखी स्वच्छ हवा उद्या देखील असावी, अशी मी प्रार्थना करतो… जो खरंच एक चमत्कारच होता.
सर्व धावपटूंसाठी ,
मॅरेथॉनला झेंडा दाखवण्यासाठी तेथे उपस्थित…— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 20, 2024
आदित्य ठाकरेंनी पुढं लिहिलं की, मॅरेथॉनला झेंडा दाखवण्यासाठी तेथे उपस्थित घटनाबाह्य सत्ताधाऱ्यांना विचारा, गेल्या वर्षभरात हवेची गुणवत्ता सुधारण्याबाबत त्यांनी काहीच का केले नाही? त्याबद्दल ते कुठे काही बोलले देखील नाही. लाखो मुंबईकरांच्या निवेदनांना त्यांनी प्रतिसाद का दिला नाही? शहरात ठिकठिकाणी खोदकाम करून, काही न काही कामकाज काढून प्रदुषण वाढवण्यासाठी बिल्डर आणि कंत्राटदारांना त्यांनी मोकळीक दिली आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत नेमकी काय चर्चा?
त्यानी लिहिलं की, तसेच पालिका आयुक्तांना विचारा ते उद्या धावणार आहेत का? घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईची हवा प्रदुषित करण्यासाठी आपल्या कंत्राटदारांना, बिल्डरांना मोकळं रान दिलं आहे. ते आयुक्तांना पटतय का? ते सहसा मुंबईकरांच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत, पण ही विचारण्याची संधी आहे, असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं.