महाराष्ट्रचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये; आदित्य ठाकरेंच्या निवडणूक आयोगावरील आरोपांवर फडणवीसांचा पलटवार
आदित्य ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत वरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी काय आणि कसा गोंधळ झाला हे सांगितलं.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत काल पत्रकार परिषद घेतली. (Mumbai) त्यामध्ये व्हिडिओ स्क्रिनींगवर प्रेझेंटेशनद्वारे निवडणूक आयोगाने मतदार यांद्यामध्ये काय घोळ केला आहे हे दाखलं. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह शिवसेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणचे थेट पुरावेच दिले. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये. मी त्यांना महाराष्ट्र पप्पू म्हणणार नाही. राहुल गांधी जशी मोठी स्क्रीन लावतात. येरझाऱ्या घालतात. पण खोदा पहाड, चुहा भी नही निकला, असे असते. आदित्य ठाकरेंनी हेच केले. त्यांची उत्तर निवडणूक आयोगाने दिलेली आहेत. आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी राहुल गांधी बनू नये, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; शवविच्छेदनाचा अहवाल आला, त्या रात्री काय घडलं
दरम्यान, कोणी शंका बाळगण्याची गरज नाही की, आम्हाला तर एनडीआरएफचे पैसे मिळाले पण १० हजार मिळाले नाहीत. १० हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत. ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही टाकतोय. पुढच्या १५ ते २० दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जातील. ९० टक्क्यांपर्यंत शेतकरी आम्ही या १५ ते २० दिवसांत कव्हर करू, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरेंचे आरोप
वरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी २, ५२, ९७० मतदार होते. ते मतदार विधानसभा निवडणुकीत २, ६३, ३५२ झाले. म्हणजेच १६, ०४३ मतांची वाढ काही महिन्यात झाली. वरळी मतदारसंघात १९, ३३३ मतदारांसंदर्भात गडबड आहे. वरळीत ५०२ मतदार अशी आहेत ज्यांची नावं जवळपास सारखीच आहेत. गिरीश गजानन म्हात्रे या मतदाराच्या वडिलांचे नाव भानजी पटेल असे आहे. गौरी गगन गुप्ता, तेजश्री हडकर या महिला मतदाराचे लिंग पुरुष असल्याचे दाखवले आहे. ६४३ मतदारांचे लिंग चुकीचे दाखवल्याचे सापडले आहे, असे पुरावे साद करत आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीत गडबड आहे, असा आरोप केला.
